दोन अभिनेत्री कधी एकत्र आल्या कि त्यांच्यातील कॅटफाईट विषयीच जास्त बोलले जाते. दोन अभिनेत्री ...
प्रार्थनाने केली सोनालीची तारीफ
/> दोन अभिनेत्री कधी एकत्र आल्या कि त्यांच्यातील कॅटफाईट विषयीच जास्त बोलले जाते. दोन अभिनेत्री एकमेकिंच्या मैत्रिणी कधीच असू शकत नाहीत असा देखील समज असतो. पण या सगळ््या अफवा असून मराठी चित्रपटसृष्टीतील अशी कितीतरी उदहारणे देता येतील ज्या अभिनेत्री एकमेकिंच्या जिवलग मैत्रिणी आहेत. यामध्ये दोन मितवांची देखील भर पडली आहे. मितवा या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे आपल्याला एकत्र दिसल्या होत्या. पण खºया आयुष्यात देखील या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. नूकतेच प्रार्थना बेहेरेने सोशल साईट्सवर सोनालीचे तोंडभरून कौतुक केले आहे. प्रार्थनाला सोनालीची पर्सनॅलिटी फार आवडते. आणि सोनालीच्या यशाचे रहस्य तिचे व्यक्तिमत्व असल्याचे प्रार्थना म्हणते. आता एवढ्या उघड उघड आपल्या स्पर्धक अ्भिनेत्रीची तारीफ करायलाही मोठे मन लागते असेच म्हणावे लागेल.