प्रसाद म्हणतो, काहीतरी धारदार शिजतंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 16:44 IST2016-08-20T11:14:38+5:302016-08-20T16:44:38+5:30

     सोशल मिडियावर कलाकार सध्या अपडेटेड असल्याचे दिसत आहेत. नवीन चित्रपट असो, मालिका, किंवा नाटक पहिल्यांदा त्याची घोषणा ...

Prasad says, something sharp shi | प्रसाद म्हणतो, काहीतरी धारदार शिजतंय

प्रसाद म्हणतो, काहीतरी धारदार शिजतंय

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
   सोशल मिडियावर कलाकार सध्या अपडेटेड असल्याचे दिसत आहेत. नवीन चित्रपट असो, मालिका, किंवा नाटक पहिल्यांदा त्याची घोषणा ही सोशल साईट्सवर होतानाच दिसत आहे. नाटक, चित्रपटांचे प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणावर फेसबुक, टष्ट्वीटरवर केले जाते. आजच्या पिढीपर्यंत आपली बातमी झापाट्याने पोहचवायची असेल तर सोशल मिडियासारखा चांगला पर्याय नाही. आता हेच पाहा ना नूकतेच अभिनेता प्रसाद ओकने देखील टष्ट्वीटरवर ढाल आणि तलवार असलेला एक फोटो अपलोड केला आहे. आणि प्रसाद म्हणतो, काहीतरी धारदार शिजतंय... आता हा प्रसादचा नवा सिनेमा आहे, मालिका कि नाटक हे जाणून घेण्यासाठी त्याच्याशी संवाद साधला असता त्याने या गोष्टीचा उलगडा केला. प्रसाद सांगतो की, हा एक सिनेमा आहे. लवकरच या सिनेमाच्या काही गोष्टी प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे देखील त्याने सांगितले. चित्रपटाचे नाव जरी गुलदस्त्यात असले तरी प्रसाद आपल्याला लवकरच एका वेगळ््या भूमिकेत पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

      {{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Prasad says, something sharp shi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.