प्रमिती नरकेने केले फोटोशुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 16:50 IST2016-08-20T11:20:22+5:302016-08-20T16:50:22+5:30

तू माझा सांगती या मालिकेत साडी, कुंकू, गोंदण, खूप सारे दागिने अशा पेहरावात दिसणारी अभिनेत्री प्रमिती नरके हिने अप्रतिम ...

Photoshop done by Prometheus hellen | प्रमिती नरकेने केले फोटोशुट

प्रमिती नरकेने केले फोटोशुट

माझा सांगती या मालिकेत साडी, कुंकू, गोंदण, खूप सारे दागिने अशा पेहरावात दिसणारी अभिनेत्री प्रमिती नरके हिने अप्रतिम फोटोशुट केले आहेत. या फोटोशुटमध्ये तिने वेगवेगळया देशात वावरणाºया महिलांचा लूक कॅरी केला आहे. यामधील तिने आफ्रिकन व युरोपीयन लूकमधील सुंदर असा फोटो सोशलमिडीयावर अपलोड केला आहे. या फोटोविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना प्रमिती म्हणाली, बरेच कलाकार एका विशिष्टय भूमिकेत अडकून राहतात. माझ्या बाबतीत मला ते होऊ दयायचे नाही. तसेच एकाच लूकमध्ये न दिसता प्रेक्षकांना मी वेगवेगळया लूकमध्ये दिसणे महत्वाचे आहे. म्हणून मी हे फोटोशुट केले आहे. हे फोटोशुट करताना खूप मजा आली. खरंच खूप भारी वाटतं ज्यावेळी तुम्ही वेगवेगळया देशातील महिलांचे लूक कॅरी करता. हे फोटोशुट अतूल शिद्धे यांनी केले आहे. 


Web Title: Photoshop done by Prometheus hellen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.