तरुणाईचे भावविश्व टिपणारा फोटोकॉपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:10 IST2016-06-04T06:40:51+5:302016-06-04T12:10:51+5:30
आजच्या तरुणाईचे भावविश्व टिपणारा फोटोकॉपी हा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी ...

तरुणाईचे भावविश्व टिपणारा फोटोकॉपी
आजच्या तरुणाईचे भावविश्व टिपणारा फोटोकॉपी हा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पौगंडावस्थेत झालेल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक करेल. फोटोकॉपी मध्ये चेतन चिटणीस हा फ्रेश चेहरा मुख्य भूमिकेत दिसणार असून, नाट्यसृष्टीत नावाजलेली अभिनेत्री पर्ण पेठे एका हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, सोबत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रमुख भूमिका आहे. फोटोकॉपी हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत कधीही न हाताळल्या गेलेल्या पद्धतीने बनवलेला असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल. चित्रपटाची पटकथा आणि संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी यांनी लिहिले आहेत. रोमँटिक कॉमेडी पठडीतला हा चित्रपट १६ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते विजय मौर्य यांनी केले आहे.