कायरो आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये द पॅनिक डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 12:21 IST2016-08-24T06:51:49+5:302016-08-24T12:21:49+5:30
Exculsive - बेनझीर जमादार मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी रंगभूमीदेखील साता समुद्रापलीकडे पोहोचली आहे. आतापर्यत परदेशात अनेक मराठी नाटकांचे ...

कायरो आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये द पॅनिक डे
मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी रंगभूमीदेखील साता समुद्रापलीकडे पोहोचली आहे. आतापर्यत परदेशात अनेक मराठी नाटकांचे प्रयोग झाले आहेत. भारताच्या बाहेर ही मराठी नाटके गाजत आहेत. आता, द पॅनिक डे हे नाटक इराणच्या कायरो आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये सादर होणार आहे. या नाटकात समाजात महिलांचे काय स्थान आहे? महिलांना कशी वागणूक दिली जाते यांसारख्या स्त्रियांच्या गंभीर प्रश्नांवर द पॅनिक डे हे नाटक भाष्य करणार आहे. इराणमध्ये देखील स्त्रियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. हे नाटक आता तिथे सादर होणार असल्यामुळे ही गंभीर समस्या तिथल्या प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे. त्यामुळे या नाटकाचा इराणमधील प्रेक्षकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या गोष्टीचा खूप आनंद होत असल्याचे अभिनेत्री प्रमिती नरके हिने लोकमत सीएनएक्सला सांगतिले. या नाटकाचे दिग्दर्शन अमोल पाटील यांनी केले असून, निर्मिती धीरेंद्र उकीरडे यांची आहे. या नाटकात पूजा ठोंबरे, प्रमिती नरके, प्रसिद्धी आयलवार, कल्याणी पाठारे या कलाकारांचा समावेश आहे. या नाटकाचा प्रयोग नोव्हेंबरमध्ये होणार आहे.