​वैभव मांगले प्रेक्षकांना दिसणार आता या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 06:05 AM2018-04-13T06:05:36+5:302018-04-13T11:35:36+5:30

वैभव मांगलेने फू बाई फू या कार्यक्रमात एकापेक्षा एक अफलातून परफॉर्मन्स सादर केले होते. त्याची शेजारी शेजारी पक्के शेजारी ...

Now this role will be seen by the audiences who wish to be celebrated | ​वैभव मांगले प्रेक्षकांना दिसणार आता या भूमिकेत

​वैभव मांगले प्रेक्षकांना दिसणार आता या भूमिकेत

googlenewsNext
भव मांगलेने फू बाई फू या कार्यक्रमात एकापेक्षा एक अफलातून परफॉर्मन्स सादर केले होते. त्याची शेजारी शेजारी पक्के शेजारी ही मालिका देखील चांगलीच गाजली होती. त्याने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावर देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. हरिश्चंद्राची फॅक्टरी, काकस्पर्श, शिक्षणाचा आयचा घो, फक्त लढ म्हणा यांसारख्या चित्रपटात त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. टाइमपास या चित्रपटात तर त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटातील त्याचे सगळे संवाद प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर वैभव मांगले आता हिंदी मालिकेकडे वळला आहे. तो सध्या मेरे साई या मालिकेत कुलकर्णी ही भूमिका साकारत असून त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणात वैभव व्यग्र असला तरी त्याने त्याच्या पहिल्या प्रेमासाठी म्हणजेच रंगभूमीसाठी खास वेळ काढला आहे. तो एका बालनाट्यात झळकणार आहे. या बालनाट्यासाठी तो जोरदार तयारी करत असून या नाटकात तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
मुलांच्या शाळेला सुट्टी लागल्यामुळे अनेक बालनाट्यं रंगभूमीवर येऊ लागली आहेत. काही जुनी गाजलेली बालरंगभूमीवरील नाट्यं देखील प्रेक्षकांना नव्याने पाहायला मिळणार आहेत. काही वर्षांपूर्वी गाजलेले 'अलबत्या गलबत्या' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मूळ नाटकात दिलीप प्रभावळकर यांनी काम केले होते. या नाटकात त्यांनी साकारलेली चेटकिणीची भूमिका चांगलीच गाजली होती. आता या नाटकात प्रेक्षकांना वैभव मांगलेला चेटकिणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या नाटकाच्या तालमींना वैभव लवकरच सुरुवात करणार असून या नाटकात काम करण्यास तो खूप उत्सुक आहे. 'अलबत्या गलबत्या'चे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेता, लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर करत आहे. अनेकवेळा बालनाट्यं ही प्रेक्षकांना केवळ सुट्ट्यांमध्येच पाहायला मिळतात. पण हे नाटक प्रेक्षकांना वर्षभर पाहायला मिळणार आहे. हे नाटक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी प्रेक्षकांना खात्री आहे. 

Also Read : मेरे साई या मालिकेसाठी हिंदी भाषेवर खूप मेहनत घेतलीः वैभव मांगले

Web Title: Now this role will be seen by the audiences who wish to be celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.