​अभिनयासोबतच या गोष्टीसाठी ओळखल्या जातात निवेदिता जोशी सराफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 15:46 IST2018-03-24T10:16:13+5:302018-03-24T15:46:13+5:30

निवेदिता जोशी सराफ यांनी १९८८ साली प्रदर्शित झालेल्या दे दणादण या मराठी चित्रपटातूून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. अशी ही ...

Nivedita Joshi Saraf, who is known for her performance in acting | ​अभिनयासोबतच या गोष्टीसाठी ओळखल्या जातात निवेदिता जोशी सराफ

​अभिनयासोबतच या गोष्टीसाठी ओळखल्या जातात निवेदिता जोशी सराफ

वेदिता जोशी सराफ यांनी १९८८ साली प्रदर्शित झालेल्या दे दणादण या मराठी चित्रपटातूून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. अशी ही बनवाबनवी, थरथराट, बाळाचे बाप ब्रम्हचारी, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला अशा एक से बढकर एक चित्रपटांतून निवेदिताने ८०-९० चा काळ आपल्या अदाकारीने चांगलाच गाजविला. निवेदिता आज देखील अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत आहेत. निवेदिता या खूप चांगल्या अभिनेत्री असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याचसोबत त्यांची आणखी एक ओळख आहे. निवेदिता सराफ या एक डिझायनर असून त्या खूप चांगल्या साड्या डिझाईन करतात. त्यांनी डिझाईन केलेल्या साड्यांचे प्रदर्शन अनेक ठिकाणी भरवले जाते. निवेदिता यांना साडी नेसणे खूप आवडत असे. त्यांच्या साड्यांची चॉईस खूप चांगली असल्याने त्या साड्या कुठून घेतात हे आवर्जून त्यांच्या मित्रमैत्रिणी त्यांना विचारत असत. त्या काही वर्षांपूर्वी ओरिसा येथे गेल्या होत्या. तेथील काही लोकांनी त्यांना साडीच्या व्यवसायाबाबत विचारले. त्यांना ही कल्पना आवडल्याने कोणत्याही नफ्याचा विचार न करता त्यांनी साड्यांचे प्रदर्शन भरवले. त्या प्रदर्शनाला त्यांनी मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील त्यांच्या अनेक मैत्रिणींना बोलावले होते. त्या प्रदर्शनाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. ओरिसामधील लोकांना मदत करण्याच्या हेतूने केवळ त्यांनी त्या साड्या घेतल्या. या लोकांना त्यांच्यामुळे खूपच चांगला मोबदला मिळायला लागला. त्यानंतर निवेदिता यांचा साड्यांमध्ये अधिक रस वाढला आणि त्यांनी स्वतः साड्या डिझाईन करायला सुरुवात केली. त्यांना भारतातूनच नव्हे तर पाश्चिमात्य देशातून देखील ऑर्डर यायला लागल्या. सपनो से भरे नैना या मालिकेच्यावेळी त्यांना स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात नृत्य करायचे होते. साडीत नृत्य करण्यात त्या तितक्या कमर्फटेबल नव्हत्या. त्यामुळे त्यांनी सलवारवर साडी नेसली पण तशी साडी चांगली दिसत नसल्याचे कोरिओग्राफरने त्यांना सांगितले. त्यामुळे त्यावेळी निवेदिता यांनी स्कर्टवर नेसता येईल अशी साडी डिझाईन केली. ही साडी काहीच मिनिटांत नेसता येते. तसेच ज्यांना साडी नेसता येत नाही. त्यांच्यासाठी देखील हा चांगला पर्याय आहे. लोकांना त्यांच्या साड्यांची डिझाईन सध्या खूपच आवडत आहेत.  

Also Read : ​अशोक सराफ यांच्या मुलाला अभिनयात नव्हे तर या क्षेत्रात आहे रस

Web Title: Nivedita Joshi Saraf, who is known for her performance in acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.