कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी जाहीर झाली नवी नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 03:23 PM2021-03-13T15:23:05+5:302021-03-13T15:23:42+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांसाठी  विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

new rules for shooting due to increase in corona patiests in maharashtra | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी जाहीर झाली नवी नियमावली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणासाठी जाहीर झाली नवी नियमावली

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. आपण चित्रीकरण करताना विशेष काळजी घेऊनच चित्रीकरण करावे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांसाठी  विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीची नियमावली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. निर्माते, तंत्रज्ञ, कलावंत, कामगार आणि चित्रपट क्षेत्राचे विविध सेवा पुरवठादार यांच्यासाठी ही नियमावली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. आपण चित्रीकरण करताना विशेष काळजी घेऊनच चित्रीकरण करावे.

जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांची लेखी परवानगी घेऊनच चित्रीकरण करावे.

चित्रीकरण स्थळी जेवढी शक्य आहे तेवढी कमी टीम ठेवावी.

सर्वांनी सोशल डिस्टिन्सिंग पाळावे.

सेटवर सॅनिटायझर, टेम्परेचर गन, ऑक्सिमिटर असणे आवश्यक आहे. तसेच याबाबतीत प्रत्येकाची रोज लेखी नोंद ठेवणे.

आपल्या युनिट मधील कोणाचे जवळचे, शेजारी कोरोना पेशंट असतील तर संबंधित व्यक्तीची कोरोना टेस्ट करून रिपोर्ट जवळ बाळगावा.

जास्त दिवस शूटिंग असेल तर सगळ्यांची कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे.

शूटिंग साहित्य सतत सँनिटाइज करणे आवश्यक आहे.

तंत्रज्ञांनी, कामगार वर्गाने हँड ग्लोव्हज, फेस शिल्ड वापरावी.

चहापाणी, नाष्टा, लंच, स्नँक्स आणि डिनर यासाठी यूज अँन्ड थ्रो परंतु पर्यावरण पूरक साहित्य वापरावे. शक्यतो पँकिंग लंच वा इतर खाद्यपदार्थ वापरावेत.

अ.भा.म.चि.महामंडळाच्या भरारी पथकातील सदस्य पाहणी करण्याकरता आले तर त्यांना सहकार्य करावे.

आपण खबरदारी घेतली तरच शूटिंग सुरळीत सुरू राहणार आहे. आपले दुर्लक्ष वा हलगर्जीपणा सरकारला शूटिंग बंदी आणण्यासाठी पूरक ठरेल. 

Web Title: new rules for shooting due to increase in corona patiests in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.