संगीत दिग्दर्शक आतीफ अफझल तिसरा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:10 IST2017-12-06T10:40:48+5:302017-12-06T16:10:48+5:30
'पुणे ५२' आणि 'बाजी'सारख्या चित्रपटांमुळे आपल्यासाठी खास चाहतावर्ग निर्माण केलेला आतीफ अफझल पुन्हा एकदा एका नव्या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ...

संगीत दिग्दर्शक आतीफ अफझल तिसरा मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला
‘चरणदास चोर’ या सिनेमाच्या पहिल्या टीजर पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांच्या सारख्या मार्मिक पण सहज विनोदाच्या शैलीने प्रभावित होऊन लेखक-दिग्दर्शक श्याम महेश्वरी आणि क्रीएटीव्ह दिग्दर्शक संजू होलमुखे यांनी त्याच पठडीतील पण आजच्या काळाला सुसंगत असणारा ‘चरणदास चोर’ या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. श्याम महेश्वरी यांनी ‘सास भी कभी बहु थी’, ‘कसोटी जिंदगी की’, ‘पलछीन’, ‘मंथन’, ‘कहानी घर घर की’, सात फेरे’ व ‘बंधन’ पासून ते अलिकडच्या ‘जोधा अकबर’ व ‘एक दुजे के वास्ते‘ पर्यंत अनेक टीव्ही मालिकांच्या हजारो भागांचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. भारतीय क्रिकेटपटू महेन्द्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत एम. एस. धोनी या चित्रपटाच्या लेखनात सहाय्यक लेखक म्हणून काम पाहिले आहे.