​एक चावट मधुचंद्रची १५० व्या प्रयोगाकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 12:01 IST2017-03-21T06:31:14+5:302017-03-21T12:01:14+5:30

एक चावट संध्याकाळ नंतर आलेल्या एक चावट मधुचंद्र या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही नाटकांची निर्माती ...

Moving to Madhavi Chandra's 150th experiment | ​एक चावट मधुचंद्रची १५० व्या प्रयोगाकडे वाटचाल

​एक चावट मधुचंद्रची १५० व्या प्रयोगाकडे वाटचाल

चावट संध्याकाळ नंतर आलेल्या एक चावट मधुचंद्र या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही नाटकांची निर्माती सुनंदा अनंत वारंग यांनी केली असून रमेश वारंग यांनी हे नाटक लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. हे नाटक आता १५० व्या प्रयोगाकडे वाटचाल करत आहे. हे नाटक नावावरून जरी चावट वाटत असले तरी यात केवळ चावटपणा नसून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नाटकात एकही नावाजलेला कलाकार नसून सर्व उदयोन्मुख कलाकारांनी या नाटकाची धुरा सांभाळली आहे.
भारतात सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढू लागले आहे. काही नवदाम्पत्यांचे घटस्फोट मधुचंद्राच्या दुसर्‍या दिवशी झालेल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे मूळ कारण म्हणजे सेक्सबद्दलची अज्ञानता आणि असमजूतपणा. लग्न झाले की नवदाम्पत्य सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागतात. एकमेकांना समजून घेणे, त्यांचा स्वभाव, त्यांचे राहणीमान, त्यांच्या कुटुंबीयांशी मिळून मिसळून वागणे हे सर्व पर्यायाने आलेच. पण बर्‍याचअंशी असे काही घडत नाही. मधुचंद्राच्या रात्री फक्त सेक्सला प्राधान्य न देता एकमेकांना समजून घेणे, आपल्या आवडी निवडीत सहभागी होणे, एकमेकांच्या गरजा ओळखणे, याकडे लक्ष केंद्रीत केले की, घटस्फोटाची प्रकरणे खूपच कमी होतील. हेच एक चावट मधुचंद्र या नाटकात मुद्देसूद दाखवण्याचा प्रयत्न रमेश वारंग यांनी केला आहे. घटस्फोट का होतो ? तो कसा टाळता येऊ शकतो? याची माहिती धमाल विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना या नाटकात पाहायला मिळत आहे. संपूर्णपणे विनोदी असणार्‍या या नाटकाचा शेवट चटका लावणारा असून प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आहे. यात सायली लिमये, तेजस जांभावडेकर, रेशमा डोयले चेटीयार, तेजस्विनी जोईल, मिनाक्षी कोंडाळकर आणि चावट भैय्याच्या भूमिकेत रमेश वारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
 




Web Title: Moving to Madhavi Chandra's 150th experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.