मिथिला पालकर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 14:34 IST2017-08-14T09:04:36+5:302017-08-14T14:34:36+5:30
युट्युब गर्ल मिथिला पालकर लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. गर्ल इन द सिटी ही मिथिला पालकरची वेबसिरिज प्रेक्षकांना प्रचंड ...
.jpg)
मिथिला पालकर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री
य ट्युब गर्ल मिथिला पालकर लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. गर्ल इन द सिटी ही मिथिला पालकरची वेबसिरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या वेबसिरिजमुळे तिला गर्ल इन द सिटी या नावानेच ओळखले जाते. वेबसिरिजमुळे नावारूपाला आल्यानंतर मिथिला चित्रपटांकडे वळली. मुरंबा या मराठी चित्रपटात ती अमेय वाघसोबत झळकली होती. या चित्रपटाचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही चांगलेच कौतुक केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच हिट झाला होता. तिने कट्टी बट्टी या हिंदी चित्रपटातही छोटीशी भूमिका साकारली होती. ती या चित्रपटात इम्रान खानच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती आणि आता ती बॉलिवूडच्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड मध्ये काम करण्यास ती खूप उत्सुक आहे.
मिथिला बॉलिवूडमधील सध्याच्या एका आघाडीच्या अभिनेत्यासोबत चित्रपटात काम करणार आहे. तिनेच ही बातमी सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना दिली आहे. लाइफ इन मेट्रो, पिकू यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिकांध्ये झळकलेल्या इरफान खानसोबत ती चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात डल्क्वीर सलमानदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. डल्क्वीर सलमान प्रसिद्ध मल्याळम अभिनेता असून या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची रॉनी स्क्रूवाला निर्मिती करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश खुराणा करत आहे. आकाशने याआधी काही चित्रपटांसाठी लेखन केले आहे. या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे. ये जवानी है दिवानी या चित्रपटाचे लेखक हुसैन दलाल यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.
Also Read : क्यूट मराठी अभिनेत्री मिथीला पालकरचा ग्लॅमरस प्रवास...