Manasi Naik : "ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं..." घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली मानसी नाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:36 PM2023-05-26T12:36:01+5:302023-05-26T13:20:09+5:30

मानसी नाईकने पहिल्यांदाच घटस्फोटावर भाष्य केलं आहे.

Marathi actress manasi naik talk about divorce married life husband pradeep kharera see post | Manasi Naik : "ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं..." घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली मानसी नाईक

Manasi Naik : "ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं..." घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली मानसी नाईक

googlenewsNext

वाट माझी बघतोय रिक्षावाला' या गाण्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Manasi naik). अभिनयापेक्षा मानसी तिच्या म्युझिक अल्बम आणि सोशल मीडियावरील वावरामुळे सर्वाधिक वेळा चर्चेत येते. गेल्या काही दिवसांपासून ती घटस्फोटामुळे चर्चेत आहे. आता तिने पहिल्यांदाच याबद्दल सविस्तर भाष्य केले आहे.

मानसीने  काही दिवसांपूर्वीच पती प्रदीप खरेरा(Pardeep Kharera)पासून विभक्त होणार असल्याचे सांगितले. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत मानसीच्या आयुष्यात अनेक बदल झाले. त्यात घटस्फोटामुळे तिला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. आता मानसीने पहिल्यांदाच तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल पोस्ट केली आहे.

मानसी नाईकची पोस्ट
ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी अर्थात या पासिंग फेजेस असतात त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा पण तरीही फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं मग आपण उदास होऊ लागतो एवढ्या तेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये माणसं म्हटली की वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे.माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात आणि त्यात वावगंही काही नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही प्रत्येक मानवी नात्यात अडचणी येतातच पण त्या सगळ्या अडचणींवर कसोट्यांवर मात करून अखेरपर्यंत आपल्या सोबत उरतात ती खरी आपली माणसं ज्यांचे हात उगीचच निसटले ते प्रवासातले तात्पुरते सोबती होते इतकंच समजायचं आणि पुढे चालू लागायचं रस्त्यात सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं त्राण आपल्यात नसतं आणि प्रत्येकवेळी तसा हट्टही आपण करायचा नसतो निमूटपणे विनातक्रार आपल्यासोबत चालत आलेल्या पावलांवर भिस्त ठेवायची फक्त ती आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची ऊस काढताना कोयत्याने पाचट सोलून काढतात तशी माणसांची निवड करत रहावी लागते कायम सरावाने ओरिजिनल माणसं ओळखू येतात आपल्याला भले ती चुकत असतील लाखदा पण आपला हात सोडून जाणार नाहीत त्यांची आपल्यावर असलेली माया कदापि आटणार नाही अशी चांगली माणसंही असतात आपल्या आयुष्यात अनेक ती मात्र जपायला हवीत काही लोकांसाठी आपण केवळ सोय असतो ते त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात गैरसोय वाटेल तेव्हा दूर जातात आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जेन्युईनली ते माणूस जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा लक्षात येतं तो क्षण फार फार दुखरा असतो जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला नाही असं नाही पण कोणावर विश्वास टाकायचा कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्याला ठरवावंच लागतं नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन बावळटपणा ठरू शकतो माणसं जोखणं जमायलाच हवं समोरच्या माणसाचं असत्य रूप आपल्याला माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते खोटंनाटं उलटंपालटं बोलून वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात मग तर त्यांची कीव येते अक्षरशः का वागत असतील माणसं अशी स्वतःसह इतरांना का फसवत असतील ज्यांच्याशी अगदी पटतच नाही त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं कटुता आणून खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं तितकी सहजता आपल्यात असावी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होताना...

 मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न १९ जानेवारी २०२१ ला पार पडले होते. त्याआधी काही काळ ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. मात्र आता लवकरच ते दोघेही विभक्त होणार आहेत.

Web Title: Marathi actress manasi naik talk about divorce married life husband pradeep kharera see post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.