प्रथमेश परबची लगीनघाई! रिअल लाइफ प्राजूसोबत थाटात पार पडलं दगडूचं केळवण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 11:12 AM2024-01-01T11:12:25+5:302024-01-01T11:12:48+5:30

नवीन वर्षात प्रथमेशला मिळणार लाइफ पार्टनर; खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत दगडू घेणार सातफेरे

marathi actor prathmesh parab to tie knot with gf kshitija ghosalkar kelvan photo viral | प्रथमेश परबची लगीनघाई! रिअल लाइफ प्राजूसोबत थाटात पार पडलं दगडूचं केळवण

प्रथमेश परबची लगीनघाई! रिअल लाइफ प्राजूसोबत थाटात पार पडलं दगडूचं केळवण

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांत स्वानंदी टिकेकर, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, सोनल पवार हे कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. आता 'टाइमपास' फेम अभिनेता प्रथमेश परब विवाहबंधनात अडकणार आहे. दगडू त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. 

प्रथमेशला त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजू मिळाली आहे. तिचं नाव क्षितीजा घोसाळकर असं आहे. यापूर्वीच प्रथमेश आणि क्षितीजाने प्रेमाची कबुली दिली होती. अनेक फोटोही त्यांनी शेअर केले होते. आता प्रथमेश आणि क्षितीजा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू असून नुकतंच त्यांचं केळवण पार पडलं. क्षितीजाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन केळवणाचे फोटो शेअर करत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं आहे. 

"#pratija चं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. (PS- तारीख खूपच Special आहे !Hint caption मध्येच आहे. Comment मध्ये guess करा) तोवर...नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! Happppppy 2024," असं क्षितीजाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.  प्रथमेश आणि क्षितीजाने अद्याप लग्नाची तारीख सांगितलेली नाही. पण त्या दोघांच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक आहेत. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रथमेशने अल्पावधीतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 'टाइमपास' चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेल्या प्रथमेशने नंतर अनेक सिनेमांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'टकाटक', 'टाइमपास' २ व ३, 'उर्फी', '३५ टक्के काटावर पास', 'लालबागची राणी', 'डॉक्टर डॉक्टर' अशा सिनेमांमध्ये तो झळकला. 'दृश्यम २'मध्ये त्याने अजय देवगणबरोबर स्क्रीन शेअर केली होती. 

Web Title: marathi actor prathmesh parab to tie knot with gf kshitija ghosalkar kelvan photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.