​या मराठी अभिनेत्याने स्पॉटबॉय म्हणून केली होती त्याच्या करियरची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 04:58 AM2017-11-22T04:58:11+5:302017-11-22T10:28:11+5:30

मेहनत करण्याची तुमच्याकडे तयारी असेल तर तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते असे आपण अनेकवेळा ऐकत असतो. पण एका मराठी ...

The Marathi actor made his debut as a Spotboy | ​या मराठी अभिनेत्याने स्पॉटबॉय म्हणून केली होती त्याच्या करियरची सुरुवात

​या मराठी अभिनेत्याने स्पॉटबॉय म्हणून केली होती त्याच्या करियरची सुरुवात

googlenewsNext
हनत करण्याची तुमच्याकडे तयारी असेल तर तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते असे आपण अनेकवेळा ऐकत असतो. पण एका मराठी कलाकाराने त्याच्या आयुष्यात ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. या अभिनेत्याने एक स्पॉटबॉय म्हणून इंडस्ट्रीत त्याच्या करियरला सुरुवात केली होती आणि हा कलाकार आज अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत आहे.
हा अभिनेता म्हणजे दुसरे कोणी नव्हे तर निखिल राऊत आहे. काहे दिया परदेस या मालिकेत त्याने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तो सध्या सुरक्षित अंतर ठेवा या नाटकात आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या नाटकातील त्याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस २०१७ मध्ये त्याला या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता' विभागात नामांकन देखील मिळाले होते. तसेच तो लवकरच एका बिग बजेट चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचा अभिनयप्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्याच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी आणि त्याच्या प्रवासात छोट्या पडद्याला असलेल्या महत्त्वाविषयी त्यानेच स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. त्याने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला एका पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, २००२ साली मी पहिल्यांदा टेलिव्हिजन साठी 'स्पाॅटबाॅय 'म्हणून कामाला सुरुवात केली. मग प्रामाणिकपणे प्रयत्न करत करत २०१७ पर्यंत स्वतःची जी काही थोडीशी ओळख निर्माण करू शकलो ती 'टेलिव्हिजन' मुळेच. टिव्ही, नाटक, सिनेमा अशा सगळ्याच माध्यमातून जरी कामं केली तरी छोट्या पडद्यामुळेच लोकांच्या घराघरांत पोहचू शकलो, त्यांच्या मनात स्थान मिळवू शकलो. आता जरी मोठा पडदा खुणावत असला तरी छोट्या पडद्याला विसरणं कधीच शक्य नाही. अजून खूप काही करायचंय छोट्या पडद्यावर. त्या संधीची वाट पाहतोय. परंतु अल्पशा कारकिर्दीत खूप काही शिकायला मिळालं ते या छोटय़ा पडद्या मूळेच. त्याचा अायुष्य भर ऋणी असेन.

nikhil raut


Also Read : निखिल राऊतला सुरक्षित अंतर ठेवासाठी मिळाले नामांकन

Web Title: The Marathi actor made his debut as a Spotboy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.