मानसी बनली पी.के
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2016 12:55 IST2016-07-25T07:25:24+5:302016-07-25T12:55:24+5:30
आपल्या दिलखेचक नृत्याच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी मानसी नाईक तिच्या लटक्या-झटक्यांमुळे रसिकांच्या ...
.jpg)
मानसी बनली पी.के
आपल्या दिलखेचक नृत्याच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी मानसी नाईक तिच्या लटक्या-झटक्यांमुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. चित्रपट, डान्स, स्टेज शोज आणि रिअॅलिटी कार्यक्रमांचे परिक्षण करणारी ही मराठमोळी मुलगी आता पी. के झाली आहे. तुम्ही म्हणाल की मानसी पी.के झाली आहे म्हणजे ती कोणत्या सिनेमात आमीर खानचा रोल करतीये का. तर तसे बिलकुलच नाहीये. एका कार्यक्रमासाठी तिने पी.के ची भुमिका साकारली आहे. आमीर खानची अॅक्टींगच नाही तर पी.के चा पुर्ण लुक तिने केला आहे. या भन्नाट लुकमध्ये मानसी खुपच मस्त दिसतेय.