मानसी नाईकच्या संगीत सेरेमनीमध्ये मानसी आणि दिपाली सय्यदने धरला ताल, पाहा हा व्हिडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 13:22 IST2021-01-19T13:21:44+5:302021-01-19T13:22:33+5:30
मानसी नाईकची काल संगीत सेरमनी पार पाडली. या संगीत सेरमनीला मानसीने तिच्या कुटुंबियांसोबत ताल धरला.

मानसी नाईकच्या संगीत सेरेमनीमध्ये मानसी आणि दिपाली सय्यदने धरला ताल, पाहा हा व्हिडिओ
बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर फेम अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. मानसीच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. मानसी नाईकची काल संगीत सेरमनी पार पाडली. या संगीत सेरमनीला मानसीने तिच्या कुटुंबियांसोबत ताल धरला. तसेच तिची लाडकी मैत्रीण दिपाली सय्यदने देखील नृत्य करत सगळ्यांची वाहवा मिळवली. लोकमतच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर हे व्हिडिओ पाहायला मिळत असून या व्हिडिओला तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मानसी बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडणार आहे. आज महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होणार आहे. मानसी तशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे. दोन दिवसांपूर्वी तिने तिची आई उखाणा घेत असतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले होते की, आकाशाचा केला कागद, समुदाची केली शाई, तरीही आईचा महिमा, लिहीता येणार नाही..आईचा उखाणा. लव्ह यू आई.
मानसीने शेअर केलेल्या व्हिडीओत मानसीच्या आईला उखाणा घेण्याचा आग्रह केला असता त्यांनी म्हटले होते की, माझी लेक आहे पडद्यावर चमचमणारी चांदणी, लग्नघटीका समीप आली, गाऊ आनंदाची गाणी, गृहमुखाचे दिवशी सांगते राजन माझे राजा आणि मी त्यांचीच राणी.
मानसी नाईकला मराठी चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या राय संबोधले जाते. तिचा लूक देखील काहीसा ऐश्वर्या सारखा आहे. त्यामुळेच कदाचित मानसीने तिच्या लग्नात ऐश्वर्याचाच एक लूक फॉलो करायचे ठरवले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या मुलाखतीत मानसीने याबाबत सांगितले होते. मानसी नाईक ही जोधा अकबरमधील ऐश्वर्यासारखीच तिच्या लग्नात तयार होणार आहे. ती म्हणाली होती की, 'ऐश्वर्या ही माझी आवडती अभिनेत्री आहे. ती जशी जोधा अकबरमध्ये तयार झाली होती तसे तयार होणे हे माझे स्वप्न आहे.
लग्नानंतर ते दोघेही प्रदीपच्या मूळ गावी फरिदाबादला रवाना होणार आहेत. मुंबईत या दोघांचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने होणार असून त्यानंतर फरिदाबादला काही विधी पार पडणार आहेत.