भगवान दादांनी फायटसंर्ना पण नाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:08 IST2016-06-04T06:38:19+5:302016-06-04T12:08:19+5:30

          १९५०-५१ चा काळ असा होता की त्यावेळी प्रत्येक गोष्टीत वेगवेगळे प्रयोग होत असायचे. भगवान ...

Lord Dada beat the fight but danced | भगवान दादांनी फायटसंर्ना पण नाचवले

भगवान दादांनी फायटसंर्ना पण नाचवले


/>          १९५०-५१ चा काळ असा होता की त्यावेळी प्रत्येक गोष्टीत वेगवेगळे प्रयोग होत असायचे. भगवान दादांच्या आयुष्यातला पहिला सोशल सिनेमा अलबेला हा ही त्या काळातला एक प्रयोगच होता. हा प्रयोग सुपरहिट ठरला आणि अलबेला तब्बल २४ आठवडे सिनेमाघरात लागून राहिला. हा अलबेला प्रवास सर्वाथार्ने खडतर होता. याच चित्रपटातल्या एका गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान सगळी तयारी झाली असताना अचानक भगवान दादांना कळले की इंडस्ट्रीतले सगळेच डान्सर राज कपूर यांच्या चित्रपटातल्या डान्सिंग सिक्वेन्ससाठी बुक आहेत. उभारलेला सेट, गीता बाली या अभिनेत्रीच्या मिळालेल्या तारखा, अशी सगळी तयारी झाली असताना बॅकग्राऊंड डान्सर्स आणायचे कुठून हा असा पेच प्रश्न भगवान दादांच्या समोर येऊन उभा ठाकला.
भगवान दादांनी त्यांच्या प्रोडक्शनशी जोडलेल्या फायटर्सकडून डान्स करून घेतला. या एकदा एका फायटरची वरात भगवान दादांच्या समोरून गेली आणि त्या वरातीत फायटर्सला नाचताना पाहून ही कल्पना त्यांना सुचली. आपण एखाद्या सिनेमासाठी स्टंट करण्याबरोबरच नृत्याविष्कार ही सादर करू शकतो, यावर त्या फायटर्स चा विश्वासच नव्हता. मात्र स्टंट्स करणा?्या या फायटर्स कडून डान्स करून घेण्याचे धैर्य भगवान दादांनी दाखवले.

Web Title: Lord Dada beat the fight but danced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.