​आता कपिल शर्मादेखील होणार ‘सैराट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 21:15 IST2016-06-03T15:45:23+5:302016-06-03T21:15:23+5:30

संपूर्ण देशाला याड लावेलेल्या ‘सैराट’ने इतिहास घडवित एक नवा रेकॉर्ड केला आहे. याच सैराटच्या झिंगाट गाण्यावर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ...

Kapil Sharma will also be seen in 'Sarat' | ​आता कपिल शर्मादेखील होणार ‘सैराट’

​आता कपिल शर्मादेखील होणार ‘सैराट’

पूर्ण देशाला याड लावेलेल्या ‘सैराट’ने इतिहास घडवित एक नवा रेकॉर्ड केला आहे. याच सैराटच्या झिंगाट गाण्यावर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’ची टीम देखील सैराट होऊन धम्माल करताना पाहायला मिळणार आहे. कारण, मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडलाही ‘याड लावलेल्या’ दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाची टीम लवकरच विनोदवीर कपिल शर्मा याच्या टेलिव्हजन शोमध्ये उपस्थिती लावणार आहे.

‘सैराट’ने मराठी चित्रपटसृष्टीत कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला असून, परशा-आर्चीच्या प्रेमकहाणीला सर्वांनी डोक्यावर घेतले आहे. नुकतेच या चित्रपटाचे दुबईत देखील दमदार शो झाले. तेथेही ‘सैराट’ने सर्वांना ‘झिंगाट’ करून सोडले. ‘सैराट’च्या या यशाची दखल आता हिंदी टेलिव्हिजनने देखील घेतली आहे. ‘कपिल शमार्चा शो’ हा हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी ओळखला जातो. पण आता त्याच्या शोमध्ये पहिल्यांदा एखाद्या मराठी चित्रपटाचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या शोमध्ये काय धम्माल पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

Web Title: Kapil Sharma will also be seen in 'Sarat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.