​कैलाश खेर यांनी गायलं मिलिंद शिंदे यांच्या मराठी चित्रपटातील गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 13:36 IST2017-09-04T08:06:03+5:302017-09-04T13:36:03+5:30

'हलगीचा टणकारा दुमदुम दुमतोया, ढोलाचा घुमारा घुमघुम घुमतोया' असे रसरशीत शब्द... कैलाश खेर यांचा दमदार आवाज... मंगेश धाकडे यांचे ...

Kailash Kher sings a song from the Marathi movie of Milind Shinde | ​कैलाश खेर यांनी गायलं मिलिंद शिंदे यांच्या मराठी चित्रपटातील गाणे

​कैलाश खेर यांनी गायलं मिलिंद शिंदे यांच्या मराठी चित्रपटातील गाणे

'
;हलगीचा टणकारा दुमदुम दुमतोया, ढोलाचा घुमारा घुमघुम घुमतोया' असे रसरशीत शब्द... कैलाश खेर यांचा दमदार आवाज... मंगेश धाकडे यांचे रांगडे संगीत लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणे गायले आहे. मिलिंद शिंदे यांनीच हे गीत लिहिले असून नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. बऱ्याच काळानंतर कैलाश खेर यांनी मराठी चित्रपटासाठी गाणे गायले असून चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे.
अॅथलेटिक्सवर आधारित हा चित्रपट असून या निमित्ताने मराठीत बऱ्याच काळाने स्पोर्ट्स फिल्मची निर्मिती होत आहे. राधे मोशन्स फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. किरण बेरड यांनी चित्रपटाचे लेखन केले असून मिलिंद शिंदे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर चित्रपटाचं संगीत मंगेश धाकडे यांचे आहे. 
या गाण्याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या गाण्याचे गीतकार मिलिंद शिंदे सांगतात, मंगेश धाकडेने गाणे संगीतबद्ध केल्यावर आम्ही गायकाच्या शोधात होतो. बऱ्याच गायकांच्या नावांचा विचार केल्यावर अचानक कैलाश खेर यांचे नाव समोर आले. आम्ही त्यांना संपर्क साधला आणि गाणे पाठवले. त्यांनी गाणे ऐकून तात्काळ गाण्यासाठी होकार दिला. रेकॉर्डिंगला येतानाही ते पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांच्या दमदार आवाजाने हे गाणे वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे. या गाण्याविषयी गायक कैलाश खेर सांगतात, या गाण्याचे शब्दच इतके दमदार आहेत की, गाणे ऐकल्यावर ते मला गावंसंच वाटलं. हे गाणे नक्कीच ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेईल. अस्सल मराठी मातीतले असे हे गाणे आहे. 
बदलत्या मराठी संगीताविषयी कैलाश खेर सांगतात, महाराष्ट्राला मोठी सांगीतिक आणि साहित्य परंपरा आहे. मराठी संगीताला पूर्वीपासूनच एक प्रकारची उंची आहे. आताच्या काळात तयार होणारे संगीतही तीच परंपरा पुढे घेऊन जात आहे. अर्थपूर्ण, हृदयाला भिडणारे शब्द आणि संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या संगीताने मराठी संगीत अधिक लोकप्रिय होऊ लागले आहे. ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.
या चित्रपटात भुषण प्रधान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Also Read : ​या खेळाडूंसोबत काय करतोय भुषण प्रधान ?

Web Title: Kailash Kher sings a song from the Marathi movie of Milind Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.