‘एक वंचित’साठी जावेद अलीने गायलं गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 09:14 AM2017-10-03T09:14:20+5:302017-10-03T14:46:37+5:30

हिंदीमध्ये लोकप्रिय असलेला गायक जावेद अली मराठी भाषिक रसिकांवरही आपल्या आवाजाची मोहिनी घालण्यात यशस्वी झाला आहे. याच कारणामुळे  मराठी ...

Javed Ali sang a song for 'Forbidden' | ‘एक वंचित’साठी जावेद अलीने गायलं गाणं

‘एक वंचित’साठी जावेद अलीने गायलं गाणं

googlenewsNext
ंदीमध्ये लोकप्रिय असलेला गायक जावेद अली मराठी भाषिक रसिकांवरही आपल्या आवाजाची मोहिनी घालण्यात यशस्वी झाला आहे. याच कारणामुळे  मराठी निर्माते-दिग्दर्शक-संगीतकारही जावेदच्या आवाजाच्या प्रेमात असल्याची प्रचिती मराठी चित्रपटांद्वारे येत आहे. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या काही आगामी चित्रपटांमध्येही जावेदने गाणी गायली आहेत. यात व्हिजीओ 9 प्रॉडक्शनच्या बेनरखाली बनणाऱ्या ‘एक वंचित’ या आगामी चित्रपटाचाही समावेश आहे.

रवीसुमन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘एक वंचित’ या चित्रपटामध्ये जावेदने “उजाडला दिसजसा निघाली ही पाखरं...’’ हे गीत गायलं आहे. पाखरांच्या माध्यमातून मानवाच्याही दिनक्रमाचं वर्णन करणारं हे गीत रवीसुमन यांनीच लिहिलं आहे. विशाल बोरूलकर यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे. जावेद अली हे आज भारतीय संगीत क्षेत्रातील नामवंत गायकांच्या यादीतील आघाडीवर असलेलं नाव आहे. आजवर जावेदने बऱ्याच मराठी चित्रपटांमधील गाणी आपल्या सुमधुर गायनाने श्रवणीय बनवली आहेत.‘एक वंचित’ या चित्रपटातील “उजाडला दिस जसा निघाली ही पाखरं..’’ हे गीत प्रेरणीदायी असून त्यातील शब्द मनाला भिडणारे असल्याचं जावेदचं म्हणणं आहे. याबाबत जावेद म्हणाला,“हे गाणं गाण्याची ऑफर जेव्हा मला देण्यात आली तेव्हा मी प्रथम चित्रपटाची वनलाइन ऐकली. त्यातून हे गाणं पटकथेत किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं समजलं.संगीतकार विशाल यांनी रवीसुमन यांनी लिहिलेल्या शब्दांना दिलेली चाल ह्दयाला भिडणारी असून हिरमुसल्या मनांना उभारी देणारी आहे. यातील स्वररचनाही इतर गीतांपेक्षा वेगळ्या पद्धतीची असल्याने गाताना काहीतरी वेगळ केल्याचं समाधान लाभलं.’’

रवीसुमन यांनी या चित्रपटात एका अशा व्यक्तीची कथा सादर केली आहे. जो एखाद्या वंचिताप्रमाणे जीवन जगत असतो. त्याच्या जोडीला त्याचं संपूर्ण कुटुंबही वंचित बनलेलं असतं. त्यांच्या मनातही काही स्वप्न असतात. ती साकार करण्यासाठी अपार कष्टाची जोड देण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्या प्रसंगांचं वर्णन करणारं “उजाडला दिस जसा निघाली ही पाखरं...’’ हे गीत पटकथेच महत्त्वाची भूमिका बजावणारं असल्याचं रवीसुमन यांचं मत आहे. या गीतातील भाव रसिकांपर्यंत योग्य तऱ्हेने पोहोचवण्यासाठी जावेद अलींसारख्या गायकाच्या आवाजाची जोड देणं गरजेचं असल्याने त्यांच्याकडे हे गीत गाण्याची जबाबदारी सोपवल्याचं रवीसुमन सांगतात. संगीतकार विशाल बोरूलकर यांचं संगीत आणि जावेद अलींचा आवाज असं सुमधुर क्रिएशन यागाण्याच्या निमित्ताने रसिकांसमोर येणार आहे.

या चित्रपटाची कथा देवबा आणि त्याच्या कुटुंबाभोवती गुंफण्यात आली आहे. रामचंद्र धुमाळ, विनया तळेकर, माधवी जुवेकर, राजेंद्र जाधव, संदिप रेडकर, सुप्रिया गावकर, प्रफुल बनकर, श्रीजा भिसे, उमेश बोलके, विकास थोरात, अनिल गावडे आदी कलाकारांनी या चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.व केमेरामन संतोष हंकारे या चित्रपटाचे छायालेखक असून, गजानन फुलारी कला दिग्दर्शक आहेत. चिराग भारती झवेरी यांनी या चित्रपटातील गीतांची कोरिओग्राफी केली आहे. दीपक दीक्षित यांनी संगभूषा केली असून, धनश्रीसाळेकर यांची वेशभूषा आहे. गिरीशकुमार तावडीया या चित्रपटाचे साऊंड रेकॉर्डिस आहेत, तर निलेश गमरेप्रॉडक्शन मेनेजर आहेत. जीवन कुंभार यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.

Web Title: Javed Ali sang a song for 'Forbidden'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.