गणितज्ञ बनणार ह्रतिक आणि थिरकणार या मराठमोळ्या संगीतकार जोडीच्या तालावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 16:09 IST2018-02-15T10:39:33+5:302018-02-15T16:09:33+5:30
मराठीतील सुपरहिट संगीतकार जोडी म्हणजे अजय-अतुल. आपल्या एकाहून एक सरस आणि हिट चालींनी या जोडीने संगीतप्रेमींना अक्षरक्षा याड लावलाय. ...

गणितज्ञ बनणार ह्रतिक आणि थिरकणार या मराठमोळ्या संगीतकार जोडीच्या तालावर!
ir="ltr" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: 1.38; margin-top: 0pt; margin-bottom: 0pt;">मराठीतील सुपरहिट संगीतकार जोडी म्हणजे अजय-अतुल. आपल्या एकाहून एक सरस आणि हिट चालींनी या जोडीने संगीतप्रेमींना अक्षरक्षा याड लावलाय. त्यामुळेच की काय या जोडीचा डंका मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही वाजतो आहे.हिंदी सिनेमांच्या गाण्यांनाही अजय-अतुल या संगीतकार जोडीने सुमधुर चाली दिल्या.कधी प्रेमाच्या रंगात दंग व्हायला लावणा-या रोमँटिक तर कधी लहानथोरांना थिकायला लावणारे धमाकेदार संगीत अजय-अतुल या जोडीने दिले.आता पुन्हा एकदा ही जोडी बॉलिवूडच्या रसिकांना वेड लावण्यासाठी येत आहे.त्यांनी संगीत दिलेला सुपर-30 हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सुपरस्टार ह्रतिक रोशन अजय-अतुलच्या संगीतावर थिरकणार आहे. या सिनेमात ह्रतिकची प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे.बिहारमध्ये भारतीय गणितज्ञ आनंद कुमार नावाचे व्यक्ती असून ते सुपर-३०’ या नावाने ते हुशार असलेल्या मात्र गरीबीमुळे मागे पडणा-या विद्यार्थ्यांना ते मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम चालवतात.याच सुपर-30वर आधारित सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत.तर सिनेमाच्या संगीताची धुरा अजय-अतुल या जोडीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या सिनेमासाठीही अजय-अतुल जोडीने आपल्या लौकिकानुसार संगी दिले आहे.त्यामुळे ज्यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे त्या आनंद कुमार यांनीही अजय अतुल जोडीचे तोंडभरुन कौतुक केले आहे. संगीताची विशाल प्रतिभा अजय-अतुल यांच्याकडे असून त्यांच्या संगीतात एक अनोखे मिश्रण पाहायला मिळते अशा शब्दांत त्यांनी या जोडीचे कौतुक केले आहे. अजय-अतुल यांच्या संगीतात एक वेगळेपण असून तीच त्यांच्या संगीतातील जादू आहे. त्यामुळेच रसिकांना त्यांचे संगीत भावते असे ते म्हणालेत.गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना ‘सुपर-३०’ हा चित्रपट समर्पित असल्याचे आनंद कुमार यांनी सांगितले.हा सिनेमा येत्या 23 नोव्हेंबर 2018ला रसिकांच्या भेटीला येणार आहे.