पाहा असा आहे नदी वाहते सिनेमाचा दुसरा टिझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 16:47 IST2017-09-02T11:17:43+5:302017-09-02T16:47:43+5:30

पर्यावरणाचा -हास होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे.त्यामुळेच आता या नद्या वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. या विषयावरच नदी वाहते हा सिनेमा भाष्य करतो.

Here is the second teaser release of the river flowing in the river | पाहा असा आहे नदी वाहते सिनेमाचा दुसरा टिझर रिलीज

पाहा असा आहे नदी वाहते सिनेमाचा दुसरा टिझर रिलीज

दीप सावंत यांनी त्यांच्या श्वास या सिनेमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला नवा श्वास निर्माण करुन दिला. श्वास या सिनेमानं रसिकांसह समीक्षकांचीही मनं जिंकली होती. तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरलेल्या श्वास या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं आणि ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत एंट्री म्हणून या सिनेमाला पाठवण्यात आलं होतं.महाराष्ट्रापासून सातासमुद्रापार मराठी सिनेमाची किर्ती पोहचवणा-या श्वास सिनेमाचे दिग्दर्शक दशकभरानंतर कमबॅक करत आहे. त्यांचा नवा सिनेमा नदी वाहते हा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल.नुकतंच या सिनेमाचा दुसरा टिझर रिलीज करण्यात आला आहे. 




'नदी' हा नागरीकरणाचा अविभाज्य भाग आहे. औद्योगिकरणामुळे देशातल्या नद्यांची पुरती वाताहत झाली आहे. उद्योगांचं पाणी नदीच्या वाहत्या पाण्यात सोडल्यानं नद्यांना अक्षरक्षा गटारगंगेचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे पर्यावरणाचा -हास होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळेच आता या नद्या वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. या विषयावरच नदी वाहते हा सिनेमा भाष्य करणारा आहे. भावनिक आणि संवेदनशील अशी या सिनेमाची कथा आहे. कोकणात या सिनेमाचं बहुतांशी शुटिंग करण्यात आलं आहे. पीफ आणि इतर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला गौरवण्यात आलं आहे. पूनम शेटगांवकर, आशा शेलार, जयंत गाडेकर, हृदयनाथ जाधव, शिव सुब्रम्हण्यम या कलाकारांच्या यांत प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Here is the second teaser release of the river flowing in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.