१० हजार खर्चून त्याने ‘सैराट’ पाहिला १०५ वेळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 13:41 IST2016-08-24T08:11:06+5:302016-08-24T13:41:06+5:30
दुसऱ्या जातीतल्या मुलीशी लग्न न झाल्यामुळे प्रेमभंग होऊन आयुष्यात नाराज झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत लोंढेने सैराट पाहिला. त्याला चित्रपटाचे ...

१० हजार खर्चून त्याने ‘सैराट’ पाहिला १०५ वेळा
त्याला सैराट इतका आवडला की जोपर्यंत सैराट चित्रपट थिएटरमध्ये आहे तोपर्यंत पाहायचा असे त्याने मनाशी ठरवूनच टाकले. लाँड्रीमध्ये काम करणाºया हनुमंतची रोजची कमाई ३०० रुपयांची आहे. यातील १०० रुपये तो रोज सैराटसाठी वेगळे काढतो. आजपर्यंत या चाहत्याने १०५ वेळा सैराट पाहिलाय. हा सैराट वेळा रोज संध्याकाळच्या शोला येतो हे लक्ष्मी थियटरच्या व्यवस्थापकांच्या लक्षात आले. त्याला याबाबत विचारले असता त्याने आजवर सैराट पाहिलेली १०५ तिकीटे दाखवली. त्याचा हा उत्साह पाहून थियएटरच्या व्यवस्थापकांनी त्याला चित्रपट पाहण्यासाठी अधिकृत पत्रच देऊ टाकले आहे. आता हा गडी काम करतो की सैराटच पाहतो हे कळेल.
हनुमंतरावांना नागराज मंजुळेंना भेटायची इच्छा आहे. त्याला चित्रपटात काम करायची इच्छा आहे. नागराजची एखाद्यावर नजर पडली तर त्या कलाकाराचे जीवनच बदलते हे आपण ऐकलंय आणि पाहिलंय देखील. कोण जाणे हा हनुमंत उंच भरारी घेईल. तोपर्यंत आपण वाट पाहूयात.