प्रिया बापटच्या कुटुंबाचा फोटो पाहिलंत का?, जाणून घ्या कोण कोण आहे तिच्या कुटुंबात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 07:00 AM2022-02-04T07:00:00+5:302022-02-04T07:00:02+5:30

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात.

Have you seen the photo of Priya Bapat's family? See who is in her family | प्रिया बापटच्या कुटुंबाचा फोटो पाहिलंत का?, जाणून घ्या कोण कोण आहे तिच्या कुटुंबात

प्रिया बापटच्या कुटुंबाचा फोटो पाहिलंत का?, जाणून घ्या कोण कोण आहे तिच्या कुटुंबात

googlenewsNext

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्याकडे कोणती गाडी आहे, कुटुंबात कोणकोण लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट(Priya Bapat)च्या कुटुंबाविषयी सांगणार आहोत..


मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अलीकडेच प्रियाने तिच्या कुटुंबाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत प्रियासह तिचा पती उमेश कामत, प्रियाचे आई-वडील आणि मोठी बहीण देखील दिसतेय. प्रियाच्या कुटुंबात आई-वडील आणि एक मोठी बहीण आहे. प्रियाने कुटुंबासोबतचा हा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. प्रियाच्या मोठ्या बहिणीचं नाव श्वेता आहे. प्रिया बापटची सख्खी बहिण श्वेता बापट सेलिब्रेटी स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर आहे. प्रिया बापटचीदेखील तिच स्टायलिस्ट आहे. प्रिया शिवाय ती बरेच सेलिब्रेटींसाठी स्टायलिस्ट म्हणून काम करते.

याशिवाय प्रिया आणि श्वेताचा सावेंची हा साडीचा ब्रॅण्ड आहे. त्यांचे सोशल मीडियावर अधिकृत पेजदेखील आहे. या अकाउंटवर साड्यांचे कलेक्शन पहायला मिळते. प्रिया आणि श्वेता या दोघी बहिणींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे.


 काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती.
 

Web Title: Have you seen the photo of Priya Bapat's family? See who is in her family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.