अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 11:37 IST2016-06-04T06:07:50+5:302016-06-04T11:37:50+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘सम्राट’ म्हणूनअशोक सराफ ओळखले जातात. त्यांनी कॉमेडी तसेच गंभीर भूमिका देखील केल्या आहेत. ‘अशी ही बनवा बनवी, ...

Happy Birthday Ashok Saraf! | अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">मराठी चित्रपटसृष्टीतील ‘सम्राट’ म्हणूनअशोक सराफ ओळखले जातात. त्यांनी कॉमेडी तसेच गंभीर भूमिका देखील केल्या आहेत. ‘अशी ही बनवा बनवी, गोंधळात गोंधळ, बिन कामाचा नवरा, लपंडाव, चौकट राजा, वझीर’ या चित्रपटांतून अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केले आहे. अशोक सराफ यांना हक्काने मामा देखील बोलले जाते. 

मामांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पण काम केले आहे. ‘येस बॉस' ते 'सिंघम’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत राहिल्या आहेत. ५ मुलींच्या हतबल बापाची भूमिका असलेली ‘हम पाँच’ ही हिंदी मालिका दूरचित्रवाणीवरील सर्वात प्रसिध्द मालिकांपैकी एक आहे.

अशोक मामांनी अभिनय मध्ये करिअर करायची सुरुवात नाटकापासून केली आणि पुढे त्यांना स्वत:च्या मेहनतीवर यश मिळत गेले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी फार प्रसिध्द होती. या दोघांची जोडी म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाकाच असायचा. असा हा डबल धमाका निदान अजून तरी कोणी देऊ शकलं नाही.

Web Title: Happy Birthday Ashok Saraf!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.