​'बंदूक्या'ला मिळत आहे प्रेक्षकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 10:45 IST2017-09-04T05:15:50+5:302017-09-04T10:45:50+5:30

वर्षासिनेव्हिजन निर्मित आणि राहुल मनोहर चौधरी दिग्दर्शित 'बंदूक्या' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यापासून चर्चेचा विषय बनला आहे. सिनेमाच्या कथेतील ...

'Gunjya' is getting a positive feedback from the audience | ​'बंदूक्या'ला मिळत आहे प्रेक्षकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

​'बंदूक्या'ला मिळत आहे प्रेक्षकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

्षासिनेव्हिजन निर्मित आणि राहुल मनोहर चौधरी दिग्दर्शित 'बंदूक्या' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यापासून चर्चेचा विषय बनला आहे. सिनेमाच्या कथेतील नवखेपणा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तोच नवखेपणा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सिनेमागृहात होणारी दर्दी प्रेक्षकांची गर्दी पाहाता मराठी सिनेमाच्या प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे. 'बंदूक्या' सिनेमाला प्रेक्षकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि समीक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप बंदूक्या सिनेमातील प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहित करणारी आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता विजय पाटकर यांनी 'बंदूक्या' बाबतीत एक विशेष प्रतिकिया नोंदविली आहे. ते सांगतात, बंदूक्या सिनेमेची कथा ताकदीची असल्याने ती जगातील कोणताही प्रेक्षक समजावून घेऊ शकतो. सिनेमाच्या बोलीभाषेचा अडसर कुठेही जाणवणार नाही. सिनेमातील कलाकारांच्या कसदार अभिनयाने हा सिनेमा जागतिक दर्जाची उंची गाठतो. त्यामुळे 'बंदूक्या'महाराष्ट्राचा नाही तर जगाचा सिनेमा ठरेल. 
बंदूक्या या सिनेमात अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकुटे, निलेश बोरसे, अतिशा नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एक आठवडा एक सिनेमा असे उत्तम गणित जमून आल्याने १ सप्टेंबर २०१७ रोजी प्रदर्शित झालेला बंदूक्या सिनेमा प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाची उत्तम मेजवानी ठरत आहे. ५४ व्या राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्ब्ल चार पुरस्कार पटकावल्याने सिनेमाला अनेक मान्यवरांकडून पसंती मिळाली आहे. अभिनेत्री अलका कुबल या बंदूक्याची विशेष दखल घेत सांगतात, मी हा सिनेमा फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिला. सिनेमातील बंदूक्या विशेष लक्ष वेधतो. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा सिनेमा एकदा तरी प्रत्येकानेच नक्की पाहिला पाहिजे.

Also Read : ​‘बंदूक्या’ सिनेमाच्या टीमची लोकमतच्या ऑफिसला भेट

Web Title: 'Gunjya' is getting a positive feedback from the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.