​सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकरची मुख्य भूमिका असलेल्या गुलाबजामचा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 04:53 AM2018-02-05T04:53:56+5:302018-02-05T10:23:56+5:30

​सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकरची मुख्य भूमिका असलेल्या गुलाबजामचा ट्रेलर लाँच सोहळा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. या सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकार, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी, निर्माते विनोद मलगेवार उपस्थित होते.

Gulabjam's trailer launch, which stars Sonali Kulkarni and Siddharth Chandekar | ​सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकरची मुख्य भूमिका असलेल्या गुलाबजामचा ट्रेलर लाँच

​सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकरची मुख्य भूमिका असलेल्या गुलाबजामचा ट्रेलर लाँच

googlenewsNext
ल्या संस्कृतीत स्वयंपाक नुसते रोजचे काम नाही तर माणसाने माणसाशी नाते जोडायचा तो एक सुंदर आणि महत्वाचा मार्ग आहे. वर्षाच्या सुरुवातीला ये रे ये रे पैसा सारखा सुपरहिट चित्रपट देऊन रसिक-प्रेक्षकांचे खुसखुशीत मनोरंजन करणाऱ्या झी स्टुडिओजचा आता सचिन कुंडलकर दिग्दर्शित गुलाबजाम हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. या सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकार, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी, निर्माते विनोद मलगेवार उपस्थित होते.  




चित्रपटाची कथा लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या आदित्यची आणि पुण्यात डबे बनवून देणाऱ्या राधाची आहे. लंडनमध्ये मराठी पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट काढायचे आदित्यचे स्वप्न आहे. आदित्य आपली लंडनमधली नोकरी सोडून मराठी पारंपरिक जेवण शिकण्याच्या हेतूने पुण्यात येऊन दाखल होतो. पुण्यात राहणाऱ्या आणि लोकांना जेवणाचे डबे बनवून देणाऱ्या राधा आगरकरचा आदित्यला शोध लागतो. सुगरण राधाचा शिष्य होणे हि सोपी गोष्ट नाही, हे आदित्यला कळून चुकते. या प्रवासात दोघांनाही एकमेकांच्या भूतकाळाविषयी कळते आणि माणूस म्हणून ते दोघे समृद्ध होत जातात. 
झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गोल्डन गेट मोशन पिक्चर यांचे विनोद मलगेवार आणि विशाल चोरडिया यांनी केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांचे असून दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांचे आहे. चित्रपटाला देबार्पितो साहा यांचे पार्श्वसंगीत लाभले आहे. या चित्रपटात मन खमंग असे गाणे असून ते संगीतबद्ध थायकुड्डम ब्रिज यांनी केले आहे. हे गाणं तेजस मोडकने लिहिले असून अवधूत गुप्तेने गायले आहे. चित्रपटात सोनाली आणि सिद्धार्थसोबतच महेश घाग, मधुरा देशपांडे, चिन्मय उदगीरकर, मोहनाबाई या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Also Read : पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा,मराठीत बोल्ड पोस्टरचा ट्रेंड!

Web Title: Gulabjam's trailer launch, which stars Sonali Kulkarni and Siddharth Chandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.