या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची होतेय सोशल मीडियावर चर्चा, केलाय मेकओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 05:00 PM2021-03-01T17:00:24+5:302021-03-01T17:03:59+5:30

या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

gayatri datar makeover picture viral on social media | या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची होतेय सोशल मीडियावर चर्चा, केलाय मेकओव्हर

या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची होतेय सोशल मीडियावर चर्चा, केलाय मेकओव्हर

googlenewsNext
ठळक मुद्देगायत्री दातार सध्या फिरायला गोव्याला गेली असून तिच्या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.

गायत्री दातार सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गायत्रीने तिचा मेकओव्हर केला असून तिच्या या नवीन लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

गायत्री दातार सध्या फिरायला गोव्याला गेली असून तिच्या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. गायत्री या फोटोत खूपच बोल्ड अँड ब्युटिफूल दिसत असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गायत्रीच्या या फोटोला 14 हजारहून अधिक लाईक मिळाले आहेत.

‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर आणि सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेने रसिकांना भुरळ पाडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीदेखील या मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

‘तुला पाहते रे’ या मालिकेत ईशाच्या भूमिकेत असलेली गायत्री दातार प्रेक्षकांची प्रचंड लाडकी होती. तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘तुला पाहते रे’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर गायत्रीने निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकात ती शहजादीच्या भूमिकेत दिसली. याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: gayatri datar makeover picture viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.