​आरती या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अनोखी प्रेमकहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 05:23 AM2017-08-11T05:23:38+5:302017-08-11T10:53:38+5:30

मराठी सिनेमा हा नेहमीच त्याच्या संहितेसाठी ओळखला जातो. उत्तम संहितेमुळे अनेक सिनेमे आजवर लक्षवेधी ठरले आहेत. सारा क्रिएशन आणि ...

In the film Aarti, the audience will see the unique love story | ​आरती या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अनोखी प्रेमकहाणी

​आरती या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अनोखी प्रेमकहाणी

googlenewsNext
ाठी सिनेमा हा नेहमीच त्याच्या संहितेसाठी ओळखला जातो. उत्तम संहितेमुळे अनेक सिनेमे आजवर लक्षवेधी ठरले आहेत. सारा क्रिएशन आणि मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्या ‘आरती- द अननोन लव्हस्टोरी’ या सिनेमातूनही मानवी मूल्य जपणारी वास्तवदर्शी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेमकथेसोबत समर्पणाची अत्यंत हृदयस्पर्शी अशी किनार या सिनेमाला लाभली आहे. वास्तवात घडलेली ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आणण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या चित्रपटामागे उभ्या राहिल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केले आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचं मन प्रेम, आपुलकी, स्नेह अशा अनंत भावनांच्या हिंदोळ्यांवर झोके घेत असतं. कधी कधी आयुष्य अशा वळणावर उभं करत की, आपल्यामागे संयमाने दृढपणे उभ्या राहणाऱ्या आधाराची गरज भासते. आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आणि नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं... मग ते नातं कोणतही असो. आजकाल सगळ्याच नात्याची समीकरणं बदलत चालल्याने नेमकं विश्वासाचं आणि हक्काचं नातं कोणतं हेच समजेनासं झालं आहे. या पार्श्वभूमीवर एकमेकांसाठी आयुष्य पणास लावणाऱ्या आरती आणि सनी यांच्या प्रेमाची अनोखी कथा ‘आरती’ या सिनेमातून आपल्यासमोर येणार आहे.
चित्रपटाला साजेशी अशी वेगवेळ्या जॉनरची सहा गीते या चित्रपटात आहेत. सुजित यादव आणि तेजस बने यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतांना प्रशांत सातोसे व सुजित–तेजस  यांनी  संगीत दिलं  आहे. यातील ‘पार्वतीच्या नंदना मोरया गजानना’, ‘पावसाळी मनी माझ्या पेटला काहूर का’ या गीताला गायक आदर्श शिंदे यांचा तर ‘मन बावरे’ गीताला हरिहरन आणि दिपाली साठे यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘नन्ही सी परी’ हे अंगाईगीत आणि ‘विठ्ठला’ हे भक्तीमय गीत प्रशांत सातोसे यांनी गायले आहे. सुजित यादव यांनी ‘आम्ही जातो’ हे गीत गायले आहे.
रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून या दोघांसोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे तसेच बालकलाकार सारा मेणे आणि अनुष्का पाटील यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते शेफाली साथी आणि बानुमती सुजित आहेत. 

Web Title: In the film Aarti, the audience will see the unique love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.