स्ट्रग्लच्या काळात फुटपाथच बनले होते निखिल राऊतचे घर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 03:57 PM2018-10-01T15:57:38+5:302018-10-01T16:00:16+5:30

आपण मोठे होऊन अभिनेता व्हायचे असे निखिलने ठरवले असले तरी अचानक त्याच्या वडिलांची नोकरी केली आणि घराची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यामुळे त्याने घराला हातभार लावण्यासाठी दूध टाकणे, छोट्या मोठ्या नोकऱ्या करणे यांसारखी कामे करायला लागली.

Farzand fame Nikhil Raut Struggling days | स्ट्रग्लच्या काळात फुटपाथच बनले होते निखिल राऊतचे घर

स्ट्रग्लच्या काळात फुटपाथच बनले होते निखिल राऊतचे घर

googlenewsNext

निखिल राऊत महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाचा उपविजेता असून त्याने काहे दिया परदेस या मालिकेत काम केले होते. त्याची फर्जंद या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या चॅलेंज या त्याच्या नाटकाचे चांगलेच कौतुक होत आहे. निखिलने आज मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्यासाठी एक जागा निर्माण केली असली तरी त्याच्यासाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याने हे यश मिळवण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केला आहे. तो मुळचा पुण्याचा असून त्याच्या घरातील कोणाचाच चित्रपटसृष्टीशी संबंध नाहीये. पण त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. चित्रपटसृष्टीतच करियर करायचे असे त्याने तेव्हाच ठरवले होते. 

आपण मोठे होऊन अभिनेता व्हायचे असे निखिलने ठरवले असले तरी अचानक त्याच्या वडिलांची नोकरी केली आणि घराची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यामुळे त्याने घराला हातभार लावण्यासाठी दूध टाकणे, छोट्या मोठ्या नोकऱ्या करणे यांसारखी कामे करायला लागली. तो एका प्युरिफायर कंपनीत कामाला होता. कामानिमित्त पुण्यातील एका गृहस्थांच्या घरी तो दुपारच्या वेळात गेला होता. दुपार असल्याने त्या घरातल्या काकू झोपल्या होत्या. त्यांनी त्यावेळी अतिशय वाईट शब्दांत निखिलचा अपमान केला होता. निखिल त्यावेळी रडतच तिथून बाहेर पडला आणि त्या दिवशीच त्याने आपण ही नोकरी सोडून अभिनेता बनण्याच्या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचे ठरवले. त्यानंतर तो प्रोडक्शन हाऊसमध्ये जे काही काम मिळेल ते करू लागला. एका कार्यक्रमाचा स्पॉटबॉय म्हणून काम करत असतानाच त्याला त्याच कार्यक्रमात सहसूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याच्या या स्ट्रग्लविषयी तो सांगतो, अभिनेता बनायचे असे मी ठरवले असल्यामुळेच मी संधीच्या शोधात पुण्यातून मुंबईत आलो. सुरुवातीला मी मुंबई-पुणे असा प्रवास रोज करायचो. पण सतत ऑडिशन देत असल्याने काही वेळा मला मुंबईतच राहावे लागत असे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण मी दादरच्या फुटपाथवर रात्री झोपायचो. सकाळी सुलभमध्ये आंघोळ करायचो आणि एखादी छोटीशी भूमिका साकारायला मिळाली तरी काम करायचो. पण नंतरच्या काळात मला काही चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि माझ्या आय़ुष्याला कलाटणी मिळाली. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाने तर मला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. 

 

Web Title: Farzand fame Nikhil Raut Struggling days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.