यशला पडली ट्युबलाईट महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 18:01 IST2016-08-10T09:43:24+5:302016-08-10T18:01:40+5:30

 प्रियांका लोंढे                      फक्त तुझ्याचसाठी या आगामी मराठी चित्रपटातून यश ...

The fall of the Tubelite in the fall | यशला पडली ट्युबलाईट महागात

यशला पडली ट्युबलाईट महागात

 
m>प्रियांका लोंढे
          
          फक्त तुझ्याचसाठी या आगामी मराठी चित्रपटातून यश कपुर हा पंजाबी मुंडा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. जबरदस्त बॉडी आणि आकर्षक चेहरा असलेल्या यशची तरुणींमध्ये चांगलीच फॅन फॉलोईंग आहे. पहिल्याच चित्रपटामध्ये अ‍ॅक्शनसीन्स करायला मिळाल्याने यश खुष झाला आहे. परंतू खलनायका सोबत मारामारी करतानाच्या एका प्रसंगा दरम्यान त्या खलनायकाचा अचानक अपघात झाला. तोच  प्रसंग यशने सीएनएक्स सोबत शेअर केला. यश म्हणाला, मला खरतर अ‍ॅक्शन सीन्स करायला फार आवडतात. या चित्रपटात मला खलनायकां सोबत मारामारी करावी लागणार हे समजल्यावरच मी आनंदी झालो होतो. आमच्या फाईट सीनचे शुट सुरु होते. मला खलनायकाच्या पाठीवर ट्युबलाईट फोडायची होती. मी ट्युबलाईट फोडली खरी पण ती खलनायकाच्या पाठीला लागली.  लाईटच्या काचा खाली जमिनिवर पडल्या. मला खलनायकाला मारुन जमिनिवर उडी घ्यायची होती. जेव्हा मी उडी घेतली आणि पडलो तेव्हा त्या ट्युबलाईटच्या काचा माझ्या पाठीत घुसल्या. पण शो मस्ट गो आॅन या स्पिरिटने मी पुन्हा उभा राहिलो. ते काहीही असले तरी यशला मात्र ट्युबलाईट चांगलीच महागात पडली असेच म्हणावे लागेल.
              

यशने याआधी अभिनेत्री सिया पाटील सोबत एका जाहिरातीत काम केले होते.  फक्त तुझ्याचसाठी हा चित्रपट  ट्रँगल लव स्टोरी आहे. यामध्ये सिया पाटील प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसेच लीना बोकेफोडे,अंकिता तारे,नफे खान,विलास उजवणे,अंजली उजवणे,हेतल राठोड,देवदास डोंगरे,भावना करीके,अंजु धर आदी कलाकार चित्रपटात पहायला मिळणार आहेत. पार्श्व मोशन पिच्चर निर्मित आणि यश फिल्म्स व्हीझन प्रस्तुत करीत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. प्यारेलाल आणि जगन्नाथ रंगधोल यांनी केली आहे.

         

चित्रपटाचे निर्माते कनक पटेल,राजेंद्र रावत,मिलिंद पांडे,ओमप्रकाश सिंग,जयेश दंड हे आहेत तसेच सहनिमार्ते अनुभव एस. विनोद आहेत. सहाय्यक निर्माते संदेश कोळी,शशीकांत मिश्रा,विशाल चौधरी आणि संगीता पटेल हे आहेत. आर्ट दिग्दर्शन  दीपक विशे व ईकबाल सुलेमान यांनी अ‍ॅक्शन दिग्दर्शन केले आहे. राहुल कांबळे यांनी या चित्रपटाची नृत्य दिग्दर्शन  उत्तम केले  आहे. त्याचप्रमाणे स्वपन रे यांनी क्रिएटिव्ह  निर्मिती संभाळली आहे. दर्शन कहर यांनी संगीत दिग्दर्शन केले असून अनिल अहिरे यांनी गाणी लिहिली आहेत. याची सुमधुर गाणी अनिर्बंन चक्रबोर्ती,सुजाता पटवा,खुशबू जैन आणि डॉली पीटर यांनी गायली आहेत.

 

 

Web Title: The fall of the Tubelite in the fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.