Exclusive पुष्करची साऊथमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 15:17 IST2016-08-26T09:47:40+5:302016-08-26T15:17:40+5:30

 प्रियांका लोंढे                साऊथच्या माल-मसाला असणाºया चित्रपटांचे वेड तर मराठमोळ््या  प्रेक्षकांनाही असल्याचे दिसून ...

Exclusive Pushkar's entry in South | Exclusive पुष्करची साऊथमध्ये एंट्री

Exclusive पुष्करची साऊथमध्ये एंट्री

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;"> प्रियांका लोंढे
  
            साऊथच्या माल-मसाला असणाºया चित्रपटांचे वेड तर मराठमोळ््या  प्रेक्षकांनाही असल्याचे दिसून येते. त्यामुळेच बहुतेक  साऊथच्या अनेक चित्रपटांचे रिमेक मराठीत देखील होऊ लागले आहेत. अहो एवढेच काय तर आपल्या मराठी कलाकारांनी देखील त्यांच्या अभिनयाची जादू साऊथमध्ये दाखविली आहे. नेहा पेंडसे, श्रृती मराठे, सुबोध भावे या कलाकारांनंतर आता अभिनेता पुष्कर जोग साऊथमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. गजनी, हॉलिडे सारख्या बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे साऊथमधील नामवंत दिग्दर्शक ए.आर मुरूगदास यांच्या चित्रपटात पुष्कर झळकणार असल्याचे कळले आहे. मुरूगदास हे नेहमीच वेगळ््या शैलीचे चित्रपट करण्यासाठी ओळखले जातात. हॉलिडेनंतर आता ते साऊथमध्ये चित्रपट बनविण्याच्या तयारीला लागले आहेत. आमीर खान, अक्षय कुमार या बॉलिवुडमधील तगड्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर ते मराठमोळ््या पुष्करला साऊथमध्ये संधी देत आहेत. या चित्रपटामध्ये संजय दत्त याने पाहुण्या कलाकाराची भूमिका करावी अशी त्यांची ईच्छा आहे. याकरीता पुष्कर जोग आणि मुरूगदास यांनी नूकतीच संजय दत्तची भेट देखील घेतली आहे. आता फक्त संजूबाबाच्या होकाराच्या प्रतिक्षेत दिग्दर्शक आहेत. एकदा का संजय दत्त ने होकार कळविला की प्रेक्षकांना संजय दत्त आणि पुष्कर जोग असा डबल धमाका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये साऊथचीच हिरोईन असणार आहे. लवकरच अभिनेत्रीची निवड होणार असल्याचे समजते. हा चित्रपट तेलगु असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचे कळते आहे. 

          

Web Title: Exclusive Pushkar's entry in South

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.