Exclusive आदिनाथ आणि पर्ण लवकरच एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 15:51 IST2016-08-16T10:21:13+5:302016-08-16T15:51:13+5:30
प्रियांका लोंढे मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय आदिनाथ कोठारे नेहमीच आपल्याला वेगवेगळ््या भूमिकांमध्ये दिसतो. तर ...

Exclusive आदिनाथ आणि पर्ण लवकरच एकत्र
मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय आदिनाथ कोठारे नेहमीच आपल्याला वेगवेगळ््या भूमिकांमध्ये दिसतो. तर मराठीतील उभरती अभिनेत्री पर्ण पेठे देखील सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करीत आहे. आता हे दोघेही आपल्याला लवकरच एका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. पर्ण पेठे आणि आदिनाथची मोठ्या पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना किती आवडते हे आपल्याला लवकरच समजेल. या चित्रपटाविषयी आदिनाथने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. आदिनाथ म्हणाला , मी लवकरच एका चित्रपटा तुम्हाला दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीष जोशी यांनी केले आहे. महेश मांजरेकर, पर्ण पेठे यांच्यासोबत मी या चित्रपटात काम करीत आहे. एवढेच नाही तर अजुनही अनेक मोठे कलाकार तुम्हाला या चित्रपटात दिसतील. या चित्रपटाचे नाव अजून तरी ठरलेले नाही. पण या सिनेमातील माझे कॅरेक्टर फारच इंटरेस्टींग आहे. एका वेगळ््या भूमिकेत तुम्ही मला या चित्रपटात पाहू शकतो. या सिनेमात बरेच कलाकार असल्याने चित्रीकरणाच्यावेळी आम्हाला फारच मजा आली. प्रत्येक कलाकारच म्हणतो की माझी या चित्रपटातील भूमिका वेगळी आहे. मी देखील असेच सांगतो पण मला एवढी खात्री आहे की प्रेक्षकांना माझी या चित्रपटातील भूमिका नक्कीच आवडेल. आदिनाथ आणि पर्ण या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम जरी करीत असले तरी त्यांच्या भूमिकांचा अजून खुलासा झालेला नाही. पण लवकरच आपल्याला एक फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे.