Exculsive सुव्रत आणि प्राजक्ताच्या जुळणार 'रेशीमगाठी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 11:51 IST2016-10-01T06:19:46+5:302016-10-01T11:51:12+5:30

 बेनझीर जमादार 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील सुजय म्हणजेच सुव्रत जोशी चित्रपटात  पर्दापण  करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात ...

Exclsive Suvrata and Prajakta will match the 'silkamathi' | Exculsive सुव्रत आणि प्राजक्ताच्या जुळणार 'रेशीमगाठी'

Exculsive सुव्रत आणि प्राजक्ताच्या जुळणार 'रेशीमगाठी'

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> बेनझीर जमादार

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील सुजय म्हणजेच सुव्रत जोशी चित्रपटात  पर्दापण  करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर मुख्य भूमिकेत प्राजक्ता माळी दिसणार आहे. या चित्रपटाविषयी सुव्रत सीएनएक्सला सांगतो,  हा माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे मी खूप उत्साही आहे. आपले आयुष्य हे आपल्या मित्रांभोवती गुरफटलेले असते हेच या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन दरेकर आहेत. तर चित्रपटाचे लेखन प्रशांत लोके आणि सचिन दरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे शुटिंग रिअल लोकेशनवर करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या तयारासाठी आमची 10 दिवसांची कार्यशाळाही घेण्यात आल्याचे सुव्रतने सांगितले आहे. या चित्रपटाचे नाव  मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. याआधी 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे सुव्रत जोशी घराघरात पोहोचला होता तर 'जुळून येती रेशीमगाठी' या  मालिकेतून आपल्याला अभिनयाने प्राजक्ता माळीनेदेखील प्रेक्षकांची मने जिंकली होती. प्राजक्ता आणि सुव्रतच्या या  हटके जोडीला प्रेक्षक किती पसंत करतात हे आपल्याला चित्रपट रिलीज झाल्यावर कळेल.   

Web Title: Exclsive Suvrata and Prajakta will match the 'silkamathi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.