युरोपचे सौदर्य रुबिक्स क्यूब या चित्रपटात पाहायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2017 01:04 PM2017-02-24T13:04:01+5:302017-02-24T18:34:01+5:30

महेश मांजरेकर दिग्दर्शित रूबिक्स क्यूब या चित्रपटाचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या सोहळयाला बॉलिवुडचा तगडा कलाकार सलमान खानसह ...

Europe's beauty pageants will be seen in the film Rubik Cube | युरोपचे सौदर्य रुबिक्स क्यूब या चित्रपटात पाहायला मिळणार

युरोपचे सौदर्य रुबिक्स क्यूब या चित्रपटात पाहायला मिळणार

googlenewsNext
ेश मांजरेकर दिग्दर्शित रूबिक्स क्यूब या चित्रपटाचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या सोहळयाला बॉलिवुडचा तगडा कलाकार सलमान खानसह अनेक नव्या तरुण कलाकारांसह दिग्गज कलावंतांनाही आपल्या उपस्थितीने या म्युझिक लाँचला  चार चांद लावले होते. रंजक कथा, उत्तम दिग्दर्शन आणि आकर्षक लोकेशन्स हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. रुबिक्स क्यूब या सिनेमाची कथा नावाप्रमाणेच वेगळी आहे. ही संपूर्ण कथा परदेशात घडते. आजवर फक्त बॉलिवूड सिनेमांमध्ये बघितलेलं युरोपचं निसर्ग सौंदर्य रुबिक्स क्यूब मुळे मराठी सिनेमातही बघता येईल.  हा संपूर्ण सिनेमा स्लोव्हेनिया, इटली, आणि स्वित्झर्लंड येथे चित्रित केला आहे. 
       
       मृण्मयी देशपांडे, गश्मीर महाजनी, सुरभी भोसले आणि सिद्धांत मुळ्ये या नव्या दमाच्या कलाकारांसह किरण यज्ञोपवीत, संदीप पाठक सारखे अनुभवी आणि मेधा मांजरेकर व महेश मांजरेकर या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे तर फ्रेश संवाद इरावती कर्णिक यांनी लिहिले आहेत. 
     
      युरोपचं निसर्गसौंदर्य,कलाकारांचा अभिनय सिनेमाची कथा आणि भव्य संगीत हि  या सिनेमाची बलस्थानं आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून नव्या दमाचा संगीतकार विशाल मिश्रा हा मराठी चित्रसृष्टी मध्ये पदार्पण करत आहे.   सिनेमाचे निमार्ते अविनाश अहाले  याबद्दल बोलताना सांगतात की, मराठी सिनेमा बदलाच्या दिशेने जात असताना त्यात माझा हातभार लागणं हे मी माझं सुदैव समजतो. तर आधीच्या सगळ्या सिनेमांपेक्षा काही तरी वेगळं करावं ही माझी इच्छा होती. नशिबाने तशी कथा लिहिली गेली. आणि ती कथा सत्यात उतरवण्यासाठी निर्मात्याचं पाठबळही मला मिळालं. हा सिनेमा माज्यासाठी खूप महत्वाकांक्षी आहे असं मत महेश मांजरेकर यांनी सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या वेळी व्यक्त केलं. 

Web Title: Europe's beauty pageants will be seen in the film Rubik Cube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.