मोनिष पवार यांचे धोंडी चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण

By Admin | Published: June 10, 2017 12:57 AM2017-06-10T00:57:05+5:302017-06-10T00:57:05+5:30

चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मोनिष पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा वेध घेणारा धोंडी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

Director-nomination from Manish Pawar's Dhondi film | मोनिष पवार यांचे धोंडी चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण

मोनिष पवार यांचे धोंडी चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण

चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मोनिष पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा वेध घेणारा धोंडी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे मोनिष यांना वाटत आहे. ९ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटातून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी वापरले जाणार आहे. धोंडी या चित्रपटात सयाजी शिंदे, पूजा पवार, विनय आपटे, विवेक चाबुकस्वार अशी उत्तम स्टारकास्ट आहे. सॉईल इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंटच्या शिवाजीराव जाधव, संतोष सुतार, निखिल नानगुडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. बोलपट एंटरटेन्मेंट आणि ओशन ९ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटातून दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केलेल्या मोनिष पवार यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, जाहिरातींसाठी सहायक म्हणून काम केले आहे. पहिल्या चित्रपटातच शेतकरी आत्महत्येसारखा गंभीर विषय त्यांनी हाताळला आहे. ‘माझ्या घरी चित्रपटाची काहीही पार्श्वभूमी नाही. शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे चित्रपट करताना शेतकऱ्यांच्या जीवनावरचाच चित्रपट करायचं ठरवलं होतं. माझ्या कुटुंबानं ज्या समस्यांना तोंड दिलं किंवा शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येतात हे मांडायचं होतं. कऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी चित्रपट हे उत्तम माध्यम आहे. धोंडी हा चित्रपट आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विचारांना नक्कीच परावृत्त करेल. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे,’ असे मोनिष यांनी सांगितले.

Web Title: Director-nomination from Manish Pawar's Dhondi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.