Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

By देवेंद्र जाधव | Published: April 22, 2024 12:34 PM2024-04-22T12:34:13+5:302024-04-22T12:34:50+5:30

दिग्पाल लांजेकरांच्या 'शिवराज अष्टक' सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकरने भूमिका साकारली आहे. चिन्मयच्या या निर्णयामुळे शिवराज अष्टकची पुढची दिशा काय? यावर दिग्पाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे (digpal lanjekar, chinmay mandlekar)

director digpal lanjekar talk about chinmay mandlekar who decide to not play the role of shivaji maharaj | Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

काल अभिनेता चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं मत मांडलं. चिन्मय यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आलं. चिन्मय आणि त्यांची पत्नी नेहा यांनाही वाईटसाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागला.  चिन्मय यांनी दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टक सिनेमांमध्ये शिवरायांची भूमिका साकारली. या सर्व प्रकरणावर दिग्पाल यांनी मौन सोडलंय. 

दिग्पाल लांजेकरांनी लोकमत फिल्मीशी बोलताना याविषयी खुलासा केला ते म्हणाले, "माझी अजून त्यासंदर्भात चिन्मय यांच्याशी कोणतीही चर्चा नाही झाली. आमचं एक जुजबी मेसेजच्या रुपात बोलणं झालं आहे. पण हा निर्णय घेण्याआधी काहीच चर्चा झाली नाही. चर्चा आज होणं आज अपेक्षित आहेत. शिवराज अष्टकमधील शिवाजी महाराजांची भूमिका माझ्या मते अजूनतरी चिन्मयच करणार आहेत. आमच्यात चर्चा झाल्यावर अंतिमतः काय निष्पन्न होईल ते कळेल. सध्या मी काही बोलायला समर्थ नाही, आणि मला अनेक गोष्टींची कल्पना नाही. 

दिग्पाल यांनी पुढे शिवराज अष्टक सिनेमांचा उल्लेख करत म्हटलं की, "कारण या सगळ्या गोष्टींवर शिवराज अष्टक अवलंबून आहे. शिवराज अष्टक फा फक्त सिनेमाचा भाग नाही. तर लोकांच्या भावनेचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्यात सहभागी व्हावं लागेल. त्यामुळे चिन्मय यांच्याशी नीट चर्चा झाल्याशिवाय काहीही बोलणं चुकीचं ठरेल." आता दिग्पालशी चर्चा केल्यावर चिन्मय शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयात फेरबदल करेल का, याची सर्व प्रेक्षकांना आशा आहे.

Web Title: director digpal lanjekar talk about chinmay mandlekar who decide to not play the role of shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.