पुष्कर श्रोत्रीचा 'उबंटू'चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 17:38 IST2017-09-02T12:08:16+5:302017-09-02T17:38:16+5:30

सामाजिक विषयावर भाष्य करणारा 'उबंटू' हा चित्रपट 15 सप्टेबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Did you watch Pushkar Shanti's Ubuntu film trailer? | पुष्कर श्रोत्रीचा 'उबंटू'चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

पुष्कर श्रोत्रीचा 'उबंटू'चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

्या मराठी चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळे विषय येताना आपण पाहतो.फक्त प्रेमकथांमध्ये न अडकता ब-याच सामाजिक विषयांच्या कथा मराठी चित्रपटांतून उलगडण्यात आलेल्या आहेत.आता पुन्हा एकदा सामाजिक विषयावर भाष्य करणारा 'उबंटू' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.विशेष म्हणजे खुद्द पुष्करनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही चित्रपटाचे स्क्रीनिंगही करण्यात आले होते. मुलांच्या दृष्टीने शाळेचे नेमके महत्त्व कशात आहे हे सांगण्यासाठी 'उबंटू' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असल्याचे पुष्करने यावेळी सांगितले होते. या चित्रपटात बंद पडणारी एक शाळा चालू राहण्यासाठी त्या शाळेतील मुले कोणते धाडस करतात अशी कथा सिनेमात मांडण्यात आली आहे.सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपटात नवोदित कलाकरांना संधी देण्यात आली असून कोणत्याही कलाकराला या चित्रपटात मेकअप करण्यात आलेला नाही.प्रत्येक कलाकार विदाऊट मेकअपमध्ये पाहायला मिळणार आहे.चित्रपटात नवोदित कलाकारांसह शशांक शेंडे,सारंग साठे, उमेश जगताप,भाग्यश्री शंकपाल आणि कान्हा भावे,अथर्व पाध्ये,आरती मोरे यांच्याही मुख्य भूमिका आहेत.येत्या 15 सप्टेबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


" / class="responsive">

" / class="responsive">

Web Title: Did you watch Pushkar Shanti's Ubuntu film trailer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.