देवदास आता मराठीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 19:24 IST2016-07-27T13:54:02+5:302016-07-27T19:24:02+5:30

एक अलबेला या चित्रपटातून अभिनेता मंगेश देसाई यांनी भगवान दादांची भूमिकेत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता, मंगेश देसाई हा ...

Devdas now in Marathi | देवदास आता मराठीमध्ये

देवदास आता मराठीमध्ये

अलबेला या चित्रपटातून अभिनेता मंगेश देसाई यांनी भगवान दादांची भूमिकेत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता, मंगेश देसाई हा देवदासच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शरतचंद्र चट्टोपाध्याय लिखित देवदास या बंगाली कादंबरीवर कित्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट तयार करण्यात आले आहेत. बॉलिवूडमध्ये कुंदन लाल सैगल यांच्यापासून ते दिलीप कुमार आणि शाहरुख खान पर्यंत देवदास हा चित्रपट केला आहे. आता हाच चित्रपट मराठीमध्ये देखील प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋतुराज धालगडे करणार आहेत. पण पारो आणि चंद्रमुखी या महत्त्वाच्या भूमिका कोण साकारणार, या गोष्टीचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.  मराठीतील देवदास हा चित्रपट २०१७ साली प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  मराठी देवदास हे प्रेक्षकांसाठी नक्कीच सरप्राईज असणार आहे. 


Web Title: Devdas now in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.