डॅनी सिंगचा रॅपला मराठमोळा तडका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 14:17 IST2017-08-19T08:47:39+5:302017-08-19T14:17:39+5:30
यो यो हनी सिंग, बादशाह, रफ्तार या रॅपर्सची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. परदेशातून आलेला रॅप हा गाण्याचा प्रकार भारतातही ...
.jpg)
डॅनी सिंगचा रॅपला मराठमोळा तडका !
य यो हनी सिंग, बादशाह, रफ्तार या रॅपर्सची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. परदेशातून आलेला रॅप हा गाण्याचा प्रकार भारतातही सुपरहिट ठरला आहे. आजच्या तरुण पीढीला बिट्सच्या तालावर थिरकवणारा रॅप हा प्रकार बॉलीवुडमधून आता मराठीमध्येही लोकप्रिय ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. नवनवीन प्रयोग आणि नव्या कल्पना आत्मसात करण्यात आघाडीवर असलेल्या मराठी इंडस्ट्रीलासुद्धा रॅप या प्रकाराची भुरळ पडली आहे. आयटमगिरी या रॅपसाँगमधून तरुणाईला ठेका धरायला लावणारा रॅपर म्हणजे डॅनी सिंग. त्याच्या आयटमगिरी या व्हिडीओ साँगच्या निमित्ताने रॅपसाँगचा फंडा मराठीत सुरु झाला आहे. मराठीत याआधी पॉप गाण्यांचा वापर झाला असला तरी पूर्ण गाणं रॅपमध्ये आणण्याचा प्रयोग डॅनीनं केला होता. त्यामुळेच डॅनी सिंगच्या 'आयटमगिरी'ला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी आणि हिंदीचं फ्युजन असलेला आयटमगिरी हा रॅप तरुणाईनं अक्षरक्षा डोक्यावर घेतला. तरुणाईची रॅपबद्दल असलेली क्रेझ पाहून डॅनी सिंग लवकरच देसी हिप हॉप हा अल्बम घेऊन येत आहे. या अल्बममध्ये पाश्चात्य संगीताचा बाज असेल. मात्र त्याला देसी तडका देण्यात आला आहे. देसी हिप हॉप या अल्बममध्ये एकूण सहा गाणी आहेत. लवकरच हा अल्बम रसिकांच्या भेटीला येणार आहे. डॅनीचे याआधी दारु पिने दे हे गाणंसुद्धा चांगलंच सुपरहिट ठरलं होतं. त्याच्या या गाण्याला सोशल मीडियावरही चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. सोशल मीडियावर नेटिझन्सकडून या गाण्याला तब्बल वन मिलियन व्हिव्यूज मिळाले होते. आता आयटमगिरी असो किंवा दारु पिने दे या गाण्यांप्रमाणेच देसी हिप हॉप हा अल्बमसुद्धा तरुणाईच्या पसंतीस पात्र ठरावा आणि सोशल मीडियावरही त्यानं धुमाकूळ घालावा अशीच काहीशी इच्छा रॅपर डॅनी सिंगची असेल.