PHOTOS : ‘या’ मराठी स्टारकिडचे फोटो पाहून तुम्ही अनन्या, सुहानाला विसराल...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 08:00 AM2021-09-10T08:00:00+5:302021-09-10T08:00:02+5:30

बॉलिवूड स्टारकिड्सला देतेय टक्कर, फोटो पाहून व्हाल थक्क

choreographer Umesh Jaadhav daughter aayushi pictures viral on social media | PHOTOS : ‘या’ मराठी स्टारकिडचे फोटो पाहून तुम्ही अनन्या, सुहानाला विसराल...!

PHOTOS : ‘या’ मराठी स्टारकिडचे फोटो पाहून तुम्ही अनन्या, सुहानाला विसराल...!

googlenewsNext
ठळक मुद्देआयुषीने अद्याप मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलेले नाही. पण तिचे ग्लॅमरस फोटो बघता, तो दिवस फार दूर नाही, असे चाहते मानत आहेत.  

बॉलिवूडच्या स्टारकिड्सची या ना त्या निमित्ताने चर्चा सुरू असते. अगदी सैफिनाच्या तैमूर- जहांगिरपासून तर शाहरूख-गौरीच्या अबराम- सुहाना खानपर्यंत अनेक स्टारकिड्स प्रचंड लोकप्रिय आहेत. हे स्टार किड्स बाहेर पडले रे पडले की पापाराझींचे कॅमेरे त्यांचा पिच्छा पुरवतात. कधी या स्टारकिड्सच्या लुकची चर्चा होते तर कधी त्यांच्या डेब्यूच्या हेडलाईन्स होतात. तूर्तास सोशल मीडियावर बॉलिवूडच्या नाही तर एका मराठी  स्टारकिडची हवा आहे. होय, सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगलीये. ती कोण तर मराठीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांची कन्या आयुषी जाधव.

उमेश जाधव यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही.  मराठी फिल्म इंडस्ट्रीतील पडद्यामागील ते एक प्रसिद्ध चेहरा आहे.  सावरखेड एक गाव,  दुनियादारी, झपाटलेला 2 , टीपी, प्यारवाली लव्हस्टोरी अशा अनेक मराठी सिनेमांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

मराठीसोबतच हिंदीतही त्यांनी काम केले आहे.  सरफरोश, सिलसिला है प्यार का,  ट्रॅफिक सिग्नल,  टोटल सियप्पा या हिंदीतील गाजलेल्या सिनेमांसाठीही त्यांनी नृत्य दिग्दर्शकाची भूमिका वठवली आहे.

याच उमेश जाधव यांची कन्या आयुषी सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. आयुषीचे सोशल मिडीयावर अधिकृत अकाउंट आहे.   या अकाउंटवर तिचे एकापेक्षा एक भारी फोटो पाहायला मिळत आहेत.

आयुषीने अद्याप मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलेले नाही. पण तिचे ग्लॅमरस फोटो बघता, तो दिवस फार दूर नाही, असे चाहते मानत आहेत.  

बॉलिवूड स्टारकीड्सनाही लाजवेल अशा तिच्या या फोटोंनी सध्या चाहत्यांना वेड लावले आहे. स्वत: उमेश जाधव यांनीही लेकीचे काही फोटो त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.

आयुषीसुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणार का ? की अभिनय क्षेत्रात करिअर करणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण लवकरच तेही कळेल.

Web Title: choreographer Umesh Jaadhav daughter aayushi pictures viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.