'बॉईज २' ह्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:00 PM2018-08-13T12:00:40+5:302018-08-13T12:04:29+5:30

'बॉईज २' सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला.

Boyz sequel coming soon | 'बॉईज २' ह्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'बॉईज २' ह्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
ठळक मुद्दे'बॉईज २' चे दिग्दर्शन केले विशाल देवरुखकरने 'बॉईज २' ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

'आम्ही लग्नाळू' म्हणत सर्व किशोरवयीन मुलांना विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या चित्रपटाने चांगलीच भुरळ पाडली होती. आता हा सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याच धम्माल मस्तीचा धुमाकूळ घेऊन येणारा हा 'बॉईज २' येत्या ५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करण्यास येत आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत 'बॉईज २' चे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले आहे. 

किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या सुपरहिट 'बॉईज'च्या दुसऱ्या पर्वात कोणकोणते कलाकार असणार आहेत, हे अद्याप समजू शकले नसले तरी, सिनेमाच्या टीझर पोस्टरवरून हा सिनेमादेखील कम्प्लीट युथ इंटरटेनिंग असल्याचे लक्षात येते. इतकेच नव्हे तर, ऋषिकेश कोळी यांनी या सिनेमाचे संवाद आणि पटकथा लिहिले असल्यामुळे यापूर्वीच्या 'बॉईज' चित्रपटात आणखीन खुमासदार संवादाची मजा 'बॉईज २' या सिनेमांतदेखील प्रेक्षकांना पुरेपूर लुटता येणार आहे. 
लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी 'बॉईज २' या सिनेमाच्या निर्मात्याची भूमिका बजावली आहे. तीन मित्रांची रंजक दुनिया दाखवणाऱ्या, या सुपरहिट सिनेमाच्या दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार? याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे. मोठ्या पडद्यावरील 'बॉईज'च्या या पुनरागमनला चाहते भरघोस प्रतिसाद देतील, अशी आशादेखील व्यक्त होत आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'बॉईज २' चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे. या चित्रपटातील कलाकार व आणखीन गोष्टी जाणून घेण्यासाठी तरूण मंडळी उत्सुक आहेत. 

Web Title: Boyz sequel coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.