बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्या 'बॉईज'ला शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:11 IST2017-09-08T06:04:06+5:302017-09-08T12:11:50+5:30

किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर भाष्य करणा-या 'बॉईज' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. घरापासून दूर बोर्डिंगमध्ये राहत असलेल्या तीन ...

Big B Amitabh Bachchan wishes 'Boyz'! | बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्या 'बॉईज'ला शुभेच्छा!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्या 'बॉईज'ला शुभेच्छा!

शोरवयीन मुलांच्या भावविश्वावर भाष्य करणा-या 'बॉईज' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. घरापासून दूर बोर्डिंगमध्ये राहत असलेल्या तीन मित्रांची हि दुनिया, प्रेक्षकांना आवडत असून, चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाला विशेष दाद दिली.८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या कलाकारांनी बिग बी यांची भेट घेतली होती, त्यादरम्यान त्यांनी सिनेमाच्या ट्रेलरचे कौतुक करत 'बॉईज' सिनेमा आवर्जून पाहणार असल्याचे सांगितले. एव्हढेच नव्हे तर, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड या सिनेमातील मुख्य कलाकारांसोबत सेल्फी काढत त्यांनी संपूर्ण टीमला चीअरअप केले. अभिनयाचा बादशहा असलेल्या अमिताभ  यांच्या शुभार्शिवादामुळे ह्या सिनेमाचा दर्जा आणखीनच वाढला आहे.सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून, अवधूत गुप्ते प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर आले आहेत.वयात येणाऱ्या मुलांची मानसिकता, त्यांची वैचारिक आणि आकलन क्षमता, तसेच स्वभावगुणाचे पैलू मांडणारा हा सिनेमा,तरुणांसाठी पर्वणी ठरणार आहे. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड अशी तीन खोडकर पोरं या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सिनेमातील त्यांची मैत्री वास्तविक जीवनातदेखील अगदी तशीच घट्ट असून, या तिघांनी सेटवर भरपूर खोड्या केल्या असल्याचे म्हंटले जाते. मात्र, असे असले तरी, हे तिघेजण आपल्या कामाबाबत खूप सजग आणि गंभीर देखील होती.  पार्थ, सुमंत आणि प्रतिक या तिघांना आपल्याच वयातील मुलांची भूमिका सिनेमात करायची असल्याकारणामुळे, दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी त्यांना सेटवर स्वच्छंद फिरण्याची चांगलीच सूट दिली होती. मात्र याचा गैरफायदा न घेता, ह्या तिघांनी अगदी शिस्तबद्धपद्धतीने आपला अभिनय पूर्ण केला. 'बॉईज' सिनेमातील या पॅशनेटींग 'बॉईज'ची एक आठवण विशाल यांनी सांगितली. 

Web Title: Big B Amitabh Bachchan wishes 'Boyz'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.