​डॉक्टरांवरील हल्ल्यांवर सुरेश वाडकर, वैशाली सामंत आणि डॉ. उत्कर्ष नाईक यांचे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2017 05:06 AM2017-04-21T05:06:28+5:302017-04-21T10:36:28+5:30

डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. नुसता डॉक्टरांचा चेहरा जरी पाहिला ...

On the attack on the doctor, Suresh Wadkar, Vaishali Samant and Dr. Uttarkesh Naik's song | ​डॉक्टरांवरील हल्ल्यांवर सुरेश वाडकर, वैशाली सामंत आणि डॉ. उत्कर्ष नाईक यांचे गाणे

​डॉक्टरांवरील हल्ल्यांवर सुरेश वाडकर, वैशाली सामंत आणि डॉ. उत्कर्ष नाईक यांचे गाणे

googlenewsNext
क्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. नुसता डॉक्टरांचा चेहरा जरी पाहिला तरी रुग्णाला ठीक झाल्यासारखे वाटायचे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे हेच नाते आता हळूहळू लोप पावत आहे. व्यावहारिकतेच्या या जगात रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्यामुळेच तर डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांची बाजू मांडण्यासाठी अभिनेत्री प्रियांका यादव 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' हे गाणे लवकरच रसिकांच्या भेटीस आणणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रोषांचा सामना करणाऱ्या आजच्या डॉक्टरांचा आक्रोश मांडणाऱ्या या गाण्याचे नुकतेच जुहू येथील आजीवासन स्टुडिओत रेकॉर्डिंग करण्यात आले. प्रवीण राजा कारळे यांनी हे गाणे दिग्दर्शित केले असून या गाण्याला रोहन पटेलने संगीत दिले आहे. सुरेश वाडकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि वैशाली सामंत यांनी हे गाणे गायले आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या मानसिकतेचा वेध घेणाऱ्या या गाण्याचे बोल काही डॉक्टरांनीच लिहिले आहेत. डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. सुनंदा डावरे अशी त्यांची नावे असून अविनाश घोडके यांनी देखील हे गाणे शब्दबद्ध करण्यात त्यांना सहाय्य केले आहे. 
उपचारादरम्यान पेशंट दगावल्यास डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांची बाजूदेखील पडताळून घेणे गरजेचे आहे. 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' हे गाणे डॉक्टरांच्या याच सकरात्मक बाजूचे दर्शन प्रेक्षकांना करून देणार आहे. हे गाणे सगळ्याच गायकांनी अतिशय ताकदीने गायले आहे. 

vaishali samant

Web Title: On the attack on the doctor, Suresh Wadkar, Vaishali Samant and Dr. Uttarkesh Naik's song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.