सामाजिक संघर्षावर भाष्य करणारा ‘अॅट्रोसिटी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 11:07 IST2018-02-17T05:37:37+5:302018-02-17T11:07:37+5:30
गेल्या काही काळात धार्मिक,जातीय तेढ निर्माण होऊन समाजात संघर्षाची पार्श्वभूमी तयार होत आहे.या सामाजिक संघर्षावर नेमकेपणाने भाष्य करणारा ‘अॅट्रोसिटी’ ...
सामाजिक संघर्षावर भाष्य करणारा ‘अॅट्रोसिटी’
ग ल्या काही काळात धार्मिक,जातीय तेढ निर्माण होऊन समाजात संघर्षाची पार्श्वभूमी तयार होत आहे.या सामाजिक संघर्षावर नेमकेपणाने भाष्य करणारा ‘अॅट्रोसिटी’ हा मराठी चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.चित्रपट हा समाजाचा आरसा असून या माध्यमातून महत्त्वाच्या मुद्दयाला स्पर्श केला जाणार आहे असे मत डॉ.राजेंद्र पडोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.निर्माते डॉ राजेंद्र पडोळे यांची निर्मिती आणि दिपक कदम यांचे दिग्दर्शन तसेच आर.पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला हा चित्रपट आहे.‘अॅट्रोसिटी’ हे नावच केवळ अनेकांना माहित असते.मात्र हा कायदा नेमका काय आहे त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो,कायद्यातून काढण्यात येणा-या पळवाटा,कायद्याचे समाजावर उमटणारे प्रतिबिंब, त्यामुळे बिघडणारा सामाजिक समतोल अशा विविध कंगो-यांवर चित्रपट भाष्य करतो.संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी संगीत संयोजन केले असून राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत.यतिन कार्येकर,लेखा राणे,गणेश यादव,विजय कदम, सुरेखा कुडची,डॉ.निशिगंधा वाड,कमलेश सुर्वे,राजू मोरे,ज्योती पाटील,शैलेश धनावडे, निखिल चव्हाण या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल ही नवी जोडी या चित्रपटात असणार आहे.
दीपक कदम,दिग्दर्शक
अॅट्रोसिटी म्हटले की अनेकांच्या भुवया उंचावतात.गेल्या काही काळात हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे.हा संवेदनशील मुद्दा असल्याने चित्रपटाच्या माध्यमातून समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.नेमकेपणाने भाष्य करताना यातून कोणतेही वाद उत्पन्न होणार नाहीत.याचीही काळजी घेण्यात आली आहे.‘अॅट्रोसिटी’मधून कोणताही उपदेश करण्यात आलेला नाही.राजकीय लोकांनी किंवा सामाजिक नेतृत्वाने सामान्यांची दिशाभूल न करता त्यांना योग्य दिशा दाखवावी अशा प्रकारचा विषय चित्रपटात हाताळण्यात आला आहे.
डॉ.राजेंद्र पडोळे,निर्माते
सामान्य लोकांसमोर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आ वासून उभा असतो. समाजातील ठरावीक लोक सामान्यांना भडकवण्याचे काम करतात. ही तेढ बाजूला ठेवून समतेचा भाव प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने ‘अॅट्रॉसिटी’ या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.
पूजा जैसवाल
चित्रपटात काम करायला सुरुवात करताना, या विषयाचे फारसे ज्ञान नव्हते.त्यामुळेच भूमिका साकारताना खूप काळजी घेण्यात आली. मी या चित्रपटामध्ये महाविद्यालयीन तरुणीची भूमिका साकारली आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांसह काम करण्याचा अनुभव मिळाला.
ऋषभ पडोळे
संवेदनशील विषय हाताळत असताना चित्रपटात जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. भूमिका साकारताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घेतली. चित्रपटाची आॅडिशन, वर्कशॉप, शूटिंग हा माझ्यासाठी खूप काही शिकण्याचा काळ होता. चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एकत्र आणणारे एक ऐतिहासिक गाणे माझ्यावर चित्रित करण्यात आले आहे. हा अनुभव रोमांच उभे करणारा आहे.
निखिल चव्हाण
मी चित्रपटामध्ये मनीष चौधरी ही नकारात्मक भूमिका साकारली आहे. जबाबदारीची भूमिका साकारताना थोडे दडपण होतेच; पण, अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळाले.