विद्याधर जोशी यांची मुख्य भूमिका असलेला अष्टवक्र ८ जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 10:18 IST2018-05-03T04:48:00+5:302018-05-03T10:18:00+5:30

माणसाच्या जडण घडणीत कुटुंब आणि समाज महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. आदी मानव देखील कालांतराने कळपाने राहताना आपण आणि इतर ...

Ashtavak, who plays Vidyadhar Joshi's main role, will meet on June 8 | विद्याधर जोशी यांची मुख्य भूमिका असलेला अष्टवक्र ८ जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विद्याधर जोशी यांची मुख्य भूमिका असलेला अष्टवक्र ८ जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

णसाच्या जडण घडणीत कुटुंब आणि समाज महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. आदी मानव देखील कालांतराने कळपाने राहताना आपण आणि इतर प्राण्यांमधील वेगळेपण ओळखू लागला. मात्र आजही समाजात विकृत, मानसिक संतुलन घालवलेली माणसं जगत आहे. त्यांना अपराधी किंवा गुन्हेगार असं थोडक्यात बोलून सगळेच मोकळे होतो. पण जन्मतः अशी माणसं अपराधी म्हणून जन्माला येतात का, त्यांना या गुन्हेगारी जगात कोण आणतं?, हे संस्कार कुठे होतात या सारख्या बऱ्याच गोष्टींची उकल 'अष्टवक्र' सिनेमात होणार आहे. येत्या ८ जून २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद अशी सर्वव्यापी जबाबदारी प्रदीप साळुंके यांनी सांभाळली आहे. या सिनेमाबाबत अधिक माहिती देताना दिग्दर्शक साळुंके सांगतात, अष्टवक्र सिनेमाच्या बांधणी करता तब्बल ३ वर्षांचे अथक परिश्रम घेतले आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून आणि सिनेमाचा नेमका विषय मांडणं ही तारेवरची कसरतच होती. पहिलाच सिनेमा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देत या सिनेमाचे चित्रीकरण केलं आहे. माझ्याप्रमाणे सिनेमातील इतरही कलाकारांचा हा पहिला वहिला सिनेमा असल्यामुळे प्रत्येकाने सिनेमाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गरोदर असताना अटक झालेल्या महिला कैदींची आणि तिथेच जन्माला येणाऱ्या मुलांची ही कहाणी आहे. काहीसा दुर्लक्षित राहिलेल्या या विषयावर 'अष्टवक्र' सिनेमाच्या निमित्ताने दृष्टिक्षेप टाकला आहे. काळजाला चटका लावून जाणाऱ्या या सिनेमाची निर्मिती वरुणराज प्रॉडक्शनचे निर्माते वरुणराज साळुंके यांनी केली आहे. सिनेमाची कथा आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे 'अष्टवक्र' सिनेमा एक वेगळीच उंची गाठतो. तसेच अभिनेता विद्याधर जोशी, अभिनेत्री मयुरी मंडलिक, मंगेश गिरी, वीणा अरुण, हर्षदा बामणे, प्रीती तोरणे-कोळी  या नवोदित कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर सिनेमाचं छायांकन विमल मिश्रा, संकलन सुबोध नारकर, गीत मयुरी मंडलिक, संगीत चंद्रोदय घोष, गायक साकार आपटे आणि गायिका रुपाली मोघे, व्हीएफएक्स विशाल पिंपळे यांचा सिनेमात सक्रिय सहभाग आहे.

Web Title: Ashtavak, who plays Vidyadhar Joshi's main role, will meet on June 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.