कलाकारांचे आॅलिम्पिक प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 18:12 IST2016-08-20T12:42:59+5:302016-08-20T18:12:59+5:30

Exculsive - बेनझीर जमादार                   क्रिकेटप्रमाणेच यंदा देशात आॅलिम्पिकचे वारे वाहू ...

Artists' Olympic Love | कलाकारांचे आॅलिम्पिक प्रेम

कलाकारांचे आॅलिम्पिक प्रेम

ong>Exculsive - बेनझीर जमादार
                 
क्रिकेटप्रमाणेच यंदा देशात आॅलिम्पिकचे वारे वाहू लागले आहेत. रिओमध्ये घडलेल्या  प्रत्येक गोष्टीची चर्चा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.  कालचा दिवस तर सोशल मीडियावर भारतवासीयांसाठी सोनेरी ठरला आहे. कुस्ती या खेळात साक्षी  मलिक या खेळाडूने कांस्यपदक जिंकले आणि भारतवासीयांच्या पदरात पहिले पदक पडले. यामुळे पूर्ण देशात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला. सोशल मीडियावर तर साक्षी मलिकसहित आॅलिम्पिक खेळाडूंचे कौतुक देशाच्या कानाकोपºयात करताना पाहायला मिळाले. तर मंत्री-महोदय, बॉलिवूडकर, मराठी कलाकार आदी लोकांनीदेखील सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले. याच आॅलिम्पिकचा आनंद मराठी कलाकारांनी ‘लोकमत सीएनएक्स’सोबत शेअर केला. 



सुयश टिळक : मला सर्वच आॅलिम्पिक खेळाडू आवडतात. कारण प्रत्येक खेळाडू हा देशाचं प्रतिनिधित्व करतो. कारण ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी आॅलिम्पिक खेळाडूंबद्दल देशभरातून टीकेचे वातावरण निर्माण झाले होते. आज साक्षी मलिक हिच्या मेडलने या सर्व टीकाकारांना कुठेतरी ब्रेक लागेल. तसेच दीपा कर्माकर हिनेदेखील आॅलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 



सिद्धार्थ मेनन : दीपा कर्माकर ही माझी आॅलिम्पिकमधील आवडती खेळाडू आहे. कारण आॅलिम्पिकपूर्वी जिम्नॅस्टिकबद्दल मी खूप वाचन केले होते. तसेच त्यावर खूप साºया डॉक्युमेंट्रीदेखील पाहिल्या होत्या. या आॅलिम्पिकमध्ये मी हॉकीला खूप फॉलो केले आहे. रेसिंगमध्ये तर मी उसेन बोल्टचा खूप मोठा चाहता आहे. आणि दीपाबद्दल म्हणायचं तर जीव धोक्यात घालणे म्हणजे मेडल जिंकण्याच्या पलीकडे आहे. पण दीपाने केलेली कामगिरीदेखील डोळ्यांत भरणारी होती. 



आदिनाथ कोठारे : दीपा कर्माकर आणि साक्षी मलिक यांच्या खेळाचा मी चाहता आहे. या दोन उत्कृष्ट महिला खेळाडूंनी आपल्या खेळाने रिओ आॅलिम्पिक गाजविले आहे. तर साक्षी, दीपा यांनी केलेली कामगिरी ही देशासाठी खरंच अभिमानास्पद आहे. आजच्या महिला या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा फडकवितात ही खूप मोठी गोष्ट आहे. 



प्राजक्ता माळी : आॅलिम्पिकमधील प्रत्येक खेळाडू माझे फेव्हरेट आहेत. कारण आॅलिम्पिकमध्ये पोहोचणे हे खूप कष्टाचे काम आहे. त्यामुळे सर्वच खेळाडूंबद्दल अभिमान आहे. त्यात साक्षीचे विशेष कौतुक वाटते. कारण रक्षाबंधन या स्पेशल दिवशी तिने एवढी मोठी कामगिरी केली आहे. यामुळे या दिवसालादेखील तिने चार चाँद लावले आहे. तिच्या पुढच्या कामगिरीसाठीदेखील खूप साºया शुभेच्छा! 



स्वानंदी टिकेकर : मला जिम्नॅस्टिक हा खेळ फार आवडतो. त्यामुळे अर्थातच मी दीपा कर्माकर हिची खूप मोठी फॅन आहे. तसेच आज कुस्तीमध्ये साक्षीने शेवटच्या क्षणी जी फाइट पलटवली ती खरंच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर आपल्या देशात या खेळांडूना प्रोत्साहन दिले जात नाही. तरी पण या महिला खेळांडूनी केलेली कामगिरी ही देशासाठी अभिमानस्पद आहे.

Web Title: Artists' Olympic Love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.