कलाकार संगीतातून देणार गणरायाला मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 17:22 IST2016-08-20T11:52:40+5:302016-08-20T17:22:40+5:30
प्रत्येकजण गणेश उत्सावाच्या तयारीला लागला आहे. शहरात ढोल ताशांचे आवाज घुमू लागले आहेत. गणेशाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी देखील चालू ...
.jpg)
कलाकार संगीतातून देणार गणरायाला मानवंदना
प रत्येकजण गणेश उत्सावाच्या तयारीला लागला आहे. शहरात ढोल ताशांचे आवाज घुमू लागले आहेत. गणेशाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी देखील चालू आहे. याच मुहूर्तावर प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनीदेखील गणेश आगमनासाठी मानवंदना दिली आहे. चित्रपटसृष्टीतील ९० कलाकारांनी एकत्रित येऊन गजवदन हे नवे गाणे तयार केले आहे. हे गजवदन...वक्रतुंड महाकाय...दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय, हे गजवदन...वक्रतुंड महाकाय...असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला सायली पकंज, निलेश मोहरीर, आर्या आंबेकर, पकंज पडघन, केतकी माटेगांवकर, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, सुरेश वाडकर, संदिप खरे आदी गायक आणि गायिकांचा आवाज लाभला आहे. या गाण्याच्या व्हिडीयोची संकल्पना डॉ. सलील कुलकर्णी यांची असून या गाण्याला संगीत देखील त्यांनीच दिले आहे.