स्पृहाच्या आस ही नवी...या गाण्याची चलती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 17:43 IST2016-07-24T12:10:21+5:302016-07-24T17:43:00+5:30

अभिनेत्री स्पृहा आणि तिचा कसदार अभिनय आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु २९ जुलैला प्रदर्शित होणाºया 'लॉस्ट अँड फाऊंड' या ...

Around the sphincter ... The song goes on floating | स्पृहाच्या आस ही नवी...या गाण्याची चलती

स्पृहाच्या आस ही नवी...या गाण्याची चलती

िनेत्री स्पृहा आणि तिचा कसदार अभिनय आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु २९ जुलैला प्रदर्शित होणाºया 'लॉस्ट अँड फाऊंड' या आगामी चित्रपटात स्पृहा  अभिनया बरोबरच प्रेक्षकांना तिच्यातली अत्यंत संवेदनशील अशी कवयित्री सुद्धा भेटणार आहे ! 'लॉस्ट अँड फाऊंड' या चित्रपटातील 'सांग ना....' आणि 'आस ही नवी.....' ही दोन गाणी स्पृहानं लिहिली असून त्यातील 'आस ही नवी....' हे गाणं 'सोशलमिडीयावर वर लाँन्च करण्यात आले. या गाण्याला दोनच दिवसात, एक लाखापेक्षा जास्त व्हिव्यूस मिळाले आहेत. त्यामुळे सध्या आस ही नवी या गाण्याची जबरदस्त चलती चालू असल्याचे दिसत आहे. आणि आता स्पृहाचं दुसरंही गाणं देखील लवकरच लाँन्च करण्यात येणार आहे. स्पृहा लहानपणापासूनच अंतर्मुख होऊन कवितेतून मोकळी होत आली आहे. तिनं आजवर अनेक कविता आणि गाणी लिहली असून ती तिच्या कविता फेसबुक आणि ट्विटर वर वेळोवेळी पोस्ट करत असते आणि तिचे असंख्य चाहते देखील तिच्या कवितांची सतत वाट पाहत असतात.  स्पृहाचा लोपामुद्रा नावाचा कविता संग्रह देखील प्रसिध्द झाला आहे .विशेष म्हणजे ती फक्त स्वत:च लिहीत नाही तर इतरांनाही लिहितं करते. शिवाय, स्पृहा नवोदित कवी लोकांना देखील लिहिण्यासाठी सतत प्रोत्साहन देत असते. म्हणूनच स्पृहा ही इतरांसाठीही प्रेरणास्थान झालीय हे खरं !

Web Title: Around the sphincter ... The song goes on floating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.