‘देवा’ मधील अंकुशचा न्यु लूक व्हायरल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 19:09 IST2016-08-25T13:39:30+5:302016-08-25T19:09:30+5:30
मराठीचा ‘स्टाईल आयकॉन’ अंकुश चौधरी लवकरच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. तो त्याच्या आगामी ‘देवा’ या चित्रपटातून झळकणार ...

‘देवा’ मधील अंकुशचा न्यु लूक व्हायरल !
या चित्रपटातील त्याचा न्यु लूक नुकताच सोशल मीडियावर वायरल झाला आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा अट्टहास बाळगणाऱ्या अंकुशच्या या न्यू लूकला नेटीजन्सकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. रंगीत सदरा, फेन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची नवी स्टाईल यामुळे या सिनेमातली त्याची भूमिका नेमकी कशी असणार याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अर्थात अंकुशचा हा अतरंगी लूक त्याच्या चाहत्यांना भुरळ पाडणाराच आहे यात काही शंका नाही.